iPhone प्रेमींसाठी खुशखबर , Apple कडून बजेट फोन लॉन्च

मोबाईल कंपनी अॅपलने आयफोन (i Phone) प्रेमींसाठी खास फोन लॉन्च केला आहे. कंपनीने बहुप्रतिक्षित आयफोन एसई 2 (iPhone SE 2) लॉन्च केला आहे (Affordable Apple Smartphone iPhone SE 2 ).

iPhone प्रेमींसाठी खुशखबर , Apple कडून बजेट फोन लॉन्च

नवी दिल्ली : मोबाईल कंपनी अॅपलने आयफोन (i Phone) प्रेमींसाठी खास फोन लॉन्च केला आहे. कंपनीने बहुप्रतिक्षित आयफोन एसई 2 (iPhone SE 2) लॉन्च केला आहे (Affordable Apple Smartphone iPhone SE 2 ). या स्मार्टफोनची विक्री 22 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा आयफोन आधी मार्चच्या अखेर बाजारात येणार होता, मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्याचं लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं.

आयफोन एसई 2 आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त आयफोन असेल. हा आईफोन आधी लॉन्च झालेल्या आयफोन एसई 2 चं अपडेटेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनचं डिव्हाईस डिझाईन आयफोन 8 सारखं आहे.

फिचर आणि स्पेसिफिकेशन

या नव्या आयफोनमध्ये 4.7 इंचाचा रेटिओ एचडी डिस्प्ले, एचडीआर 10 प्लेबँक, डॉल्बी व्हिजन, टच आयडीसह (Touch ID) होम बटन आहे. मात्र, या स्मार्टफोनला 3.5mm हेडफोन जॅक नसणार आहे. ज्या युजर्सला कम किमतीत लेटेस्ट आयफोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे हा फोन डस्ट आणि वॉटरप्रूफ असेल. त्याची बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अॅल्यूमिनिअमची असेल.

या व्यतिरिक्त फोनचा रेअर कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल. त्याचा अॅपर्चर F/1.8 चा आहे. फोनमध्ये एचडीआर आणि पोट्रेट फिचर्सची लेन्स 7 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या आयफोनमध्ये 4 के व्हिडीओग्राफी देखील करता येणार आहे.

आयफोन एसई 2 आणि ए 13 बायॉनिक चिपसेटवर चालेल. हा चिपसेट एनर्जी सेव्हर म्हणूनही काम करेल. अॅपलच्या लेटेस्ट मॉडेल आयफोन 11 (iPhone 11) सिरीजमध्ये देखील याच चिपसेटचा उपयोग करण्यात आला आहे. आयफोन एसई 2 मध्ये लेटेस्ट iOS 13 असेल.

स्टोरेज

या फोनमध्ये 3GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबीच्या इंटरनल स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.

बॅटरी

या फोनची बॅटरी क्षमता देखील चांगली आहे. हा फोन वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो. हा फोन केवळ अर्ध्यातासात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल, असा दावा अॅपलने केला आहे.

किंमत

iPhone SE 2 ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. या आयफोनच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 42,500 रुपये आहे.

Affordable Apple Smartphone iPhone SE 2

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *