बजाजच्या बहुप्रतीक्षित 'डॉमिनर 400' लॉन्चिंगची तयारी सुरु

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात होऊन, महिना संपायला आला. मात्र, ऑटो बाजारात फार काही नवीन घडताना दिसत नाही. मात्र, हे नवीन घडवण्यासाठी बजाज ही भारतीय कंपनी पावलं उचलणार आहे. कारण बजाजने ‘डॉमिनर 400’ बहुप्रतीक्षित सुपर बाईक लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. फेब्रुवारी महिन्यात बजाज ‘डॉमिनर 400’ लॉन्च करणार आहे. बीएसव्हीआय तंत्रज्ञान आमि एबीएस फीचर्समुळे …

बजाजच्या बहुप्रतीक्षित 'डॉमिनर 400' लॉन्चिंगची तयारी सुरु

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात होऊन, महिना संपायला आला. मात्र, ऑटो बाजारात फार काही नवीन घडताना दिसत नाही. मात्र, हे नवीन घडवण्यासाठी बजाज ही भारतीय कंपनी पावलं उचलणार आहे. कारण बजाजने ‘डॉमिनर 400’ बहुप्रतीक्षित सुपर बाईक लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. फेब्रुवारी महिन्यात बजाज ‘डॉमिनर 400’ लॉन्च करणार आहे. बीएसव्हीआय तंत्रज्ञान आमि एबीएस फीचर्समुळे बजाजच्या या आगामी बाईकबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

डॉमिनर 400 ही बजाज कंपनीची आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल्ल आणि महागडी बाईक्समधील एक आहे. दीड लाख ते 1.65 लाख रुपयांदरम्यान बजाज डॉमिनर 400 ची किंमत आहे.

नॉन अँटी-ब्रेकिंग सिस्टम असणाऱ्या या बाईकची किंमत 1.49 लाख आणि एबीएस सिस्टम असणाऱ्या बाईखची किंमत 1.63 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला काही सवलतीही जाहीर करण्यात येणार आहेत.

बजाज डॉमिनर 400 बाईकचे फीचर्स काय आहेत?

  • 373 सीसी लिक्विड-कूल फ्युअल इंजेक्टेड इंजिन
  • सिंगल-सिलिंडर इंजिन 35 बीएचपी पॉवर
  • 35 न्यूटन मीटर टॉर्क
  • 6 स्पीड गिअरबॉक्स
  • स्लिपर क्लच
  • स्टँडर्ड फिटमेंट
  • 148 किमी प्रती तास वेग
  • ट्विन पोर्ट एग्जॉस्ट सिस्टम
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *