नवा फोन येण्यापूर्वी खास ऑफर, शाओमीच्या या पाच फोनवर भरघोस सूट

मुंबई : शाओमीच्या भारतीय ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शाओमीच्या पाच स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळणार  आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच IDC च्या रिपोर्टनुसार चीनची शाओमी ही कंपनी भारतीय बाजारपेठेत सलग तिसऱ्या तिमाहीतही पहिल्या स्थानावर आहे. शाओमीने जेव्हापासून भारतीय बाजारपेठेत एंट्री घेतली आहे, तेव्हापासूनच इतर कंपन्यांच्या तुलनेत ती वरचढ ठरत आली आहे. आता सलग तिसऱ्या …

नवा फोन येण्यापूर्वी खास ऑफर, शाओमीच्या या पाच फोनवर भरघोस सूट

मुंबई : शाओमीच्या भारतीय ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शाओमीच्या पाच स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळणार  आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच IDC च्या रिपोर्टनुसार चीनची शाओमी ही कंपनी भारतीय बाजारपेठेत सलग तिसऱ्या तिमाहीतही पहिल्या स्थानावर आहे. शाओमीने जेव्हापासून भारतीय बाजारपेठेत एंट्री घेतली आहे, तेव्हापासूनच इतर कंपन्यांच्या तुलनेत ती वरचढ ठरत आली आहे. आता सलग तिसऱ्या तिमाहीतही शाओमीने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. शाओमीचे कंट्री हेड मनु जैन यांनी कंपनीचे हे यश सेलिब्रेट करण्यासाठी शाओमीच्या काही स्मार्टफोन्सच्या किमती कमी करण्याचं जाहीर केलं.

शाओमीच्या Redmi Note 5 Pro (6GB), Redmi Note 5 Pro(4GB), Mi A2 (6GB), Mi A2 (4GB), Redmi Y2 (4GB) स्मार्टफोनच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना या पाच फोनपैकी कोणताही फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

Redmi Note 5 Pro :

रॅम 4GB, इंटर्नल स्टोरेज 64GB

-आधीची किंमत 14,727 रुपये आणि आताची किंमत 13,999 रुपये

रॅम 6GB, इंटर्नल स्टोरेज 64GB  

-आधीची किंमत 16,999 रुपये आणि आताची किंमत 15,999

Mi A2 :

रॅम 4GB, इंटर्नल स्टोरेज 64GB

-आधीची किंमत 16,999 रुपये आणि आताची किंमत 15,999

रॅम 6GB, इंटर्नल स्टोरेज128GB   

-आधीची किंमत 19,999 रुपये आणि आताची किंमत 18,999

Redmi Y2 :

रॅम 4GB, इंटर्नल स्टोरेज 64GB

आधीची किंमत 12,999 रुपये आणि आताची किंमत 11,999

मोबाईलच्या किंमती कमी करण्यामागे फक्त हेच एक कारण नाही. शाओमी येत्या 22 नोव्हेंबरला Redmi Note 6 Pro लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये दोन रिअर आणि दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. भारतात याची विक्री 23 नोव्हेंबर पासून सुरू होईल. त्यामुळे मोबाईलच्या किमती कमी करण्यामागे हे देखिल एक कारण असू शकतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *