कॉल करा आणि पैसे कमवा, बीएसएनएलकडून धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनट चार्ज (BSNL give 6 paise cash back offer) केले जातील, अशी घोषण केली होती.

कॉल करा आणि पैसे कमवा, बीएसएनएलकडून धमाकेदार ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओने दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनट चार्ज (BSNL give 6 paise cash back offer) केले जातील, अशी घोषण केली होती. त्यामुळे जिओ युजर्समध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता तोट्यात चाललेली सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने प्रति कॉल 6 पैसे (BSNL give 6 paise cash back offer) देणार, अशी घोषणा केली.

बीएसएनएलच्या या नव्या घोषणेमुळे सर्वच युजर्समध्ये चर्चा सुरु झालीय. प्रत्येक टेलिकॉम वेगवेगळ्या ऑफर्स देतात. पण बीएसएनएल थेट कॅशबॅक ऑफर देत असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युजर्सने पाच मिनिटापेक्षा अधिक जर कॉल केला तर त्याच्या अकाऊंटमध्ये 6 पैसे दिले जातील. बीएसएनएल सध्या तोट्यात सुरु आहे. त्यामुळे कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत.

“डिजिटल जमान्यात जिथे ग्राहकांना व्हॉईस आणि डाटा क्वॉलिटी सर्व्हिस पाहिजे असते. तिथे आम्ही ग्राहकांना अपग्रेडेड नेक्स्ट जनरेशन नेटवर्क देण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांना चांगला अनुभव मिळावा”, असं बीएसएनएल डायरेक्टर विवेक बंजल यांनी सांगितले.

“6 पैसे कॅशबॅक ऑफर वायरलाईन, ब्रॉडबँड आणि FTTH ग्राहकांसाठी आहे. त्यामुळे जिओचे नाराज युजर्स बीएसएनएलकडे वळतील, बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल का, हे भविष्यात कळेल”, असंही बंजल यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *