BSNL चा नवा प्लान, 540 जीबी डेटा, 180 दिवसांची वैधता

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर लाँच (BSNL new plan launch) केली आहे.

BSNL चा नवा प्लान, 540 जीबी डेटा, 180 दिवसांची वैधता

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर लाँच (BSNL new plan launch) करत आहे. कंपनीकडून आता सर्वाधिक वैधता असलेला एक नवीन प्लान लाँच (BSNL new plan launch) केला जात आहे. या नव्या प्लानची किंमत 997 रुपये आहे. कंपनीच्या या प्लानची स्पर्धा एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जिओ प्लानच्या किंमतीसोबत होणार आहे.

या प्लानसोबत मोफत दोन महिन्यांसाठी आपल्या आवडीची रिंगबॅक टोनही लावण्याची सुविधा दिली जात आहे.

कंपनीने दिलेल्या या नव्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली आहे. प्लानची वैधता 180 दिवसांची दिली आहे. हा प्लान 10 नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनीने हा प्लान केरळ सर्कलमध्ये सुरु केला आहे. बीएसएनएलचे एकट्या केरळमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहेत.

बीएसएनएलच्या प्लानची स्पर्धा भारतीय एअरटेलच्या 998 रुपयाचा प्लान, वोडाफोन, आयिडया आणि जिओचा 999 रुपयाचा प्लानसोबत होणार आहे. या तिन्ही कंपनीच्या प्लानची वैधता कमीत कमी 90 दिवसांची आहे. एअरटेलच्या 998 रुपयांच्या प्लानची वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 12 जीबीचा डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते. तसेच वोडाफोनच्या प्लानची वैधताही 365 दिवसांची आहे. जिओच्या 999 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवसांची आहे. ज्यामध्ये 60 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते.

दरम्यान, बीएसएनएलच्या या नव्या प्लानमुळे एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जिओ कंपन्यांना मोठी टक्कर मिळणार आहे. बीएसएनएल एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. गेले काही दिवस कंपनी तोट्यात असून कंपनीकडून अनेक नवनवीन ऑफर ग्राहकांसाठी लाँच केले जात आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *