फक्त 70 रुपयात खरेदी करा ओप्पोचा 45 हजारांचा फोन

मुंबई : सध्या मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. नुकतेच ओप्पोने 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ‘70 ऑन 70 प्रमोशन’ ऑफर सुरु केली आहे. यामध्ये Oppo R17 Pro स्मार्टफोन तुम्ही 70 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनची किंमत तब्बल 45 हाजार आहे. ओप्पोने या ऑफरसाठी बजाज …

फक्त 70 रुपयात खरेदी करा ओप्पोचा 45 हजारांचा फोन

मुंबई : सध्या मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. नुकतेच ओप्पोने 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ‘70 ऑन 70 प्रमोशन’ ऑफर सुरु केली आहे. यामध्ये Oppo R17 Pro स्मार्टफोन तुम्ही 70 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनची किंमत तब्बल 45 हाजार आहे. ओप्पोने या ऑफरसाठी बजाज फायनान्ससोबत टायप केला आहे. तसेच या ऑफरच्या माध्यमातून ओप्पो विकत घेणाऱ्या ग्राहकांना बाकीचे पैसे 6 ईएमआयद्वारे भरता येणार आहे. ही ऑफर 22 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन स्टोअरवर उपलब्ध आहे.

मागील काही दिवस सॅमसंग, शाओमीने ही आपल्या फोनच्या किंमतीत घट करुन सेल आयोजित केला होता. मोठ्या प्रमाणात त्यांनी यावेळी आपल्या मोबाईलची विक्री केली होती. आता ओप्पोनेही आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट अशी ऑफर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ओप्पोने सुरु केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना 45 हजारांचा फोन केवळ 70 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ओप्पोचे फोन ग्राहकांच्या खूप पसंतीस येतात. ओप्पो स्मार्टफोनचा लूक आणि कॅमेरा या दोन गोष्टीमुळे हा फोन ग्राहाकंच्या जास्त पसंतीस उतरत आहे. तसेच कमी दरात अनेक फीचर्स या फोनमध्ये उपलब्ध आहेत.

ओप्पो आर 17 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

अँड्रॉईड 8.1 ओरियो

6.4 इंचाचा FHD+ डिस्प्ले

AMOLED स्क्रीन आणि वाटरड्रॉप नॉच

गोरिल्ला ग्लास 6

8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टओरेज

ओप्पो आर 17 प्रो कॅमेरा

ओप्पो आर17 प्रोमध्ये तीन कॅमेरे दिले आहेत. एस सेंसर 12 मेगापिक्सल आहे आणि दुसरा 20 मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सलचा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हीटी

ओप्पो आर17 प्रोमध्ये 3700 mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच 4 जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस आणि एनएफसी सपोर्टचा समावेश आहे. ओप्पो आर17 इन-डिस्प्ले फिंगरप्रींट सेसंर दिला आहे.  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *