आता रात्री-बेरात्री गुगल ड्युओ वापरा

मुंबई : गुगल आपल्या व्हिडीओ चाटिंग अॅप ड्युओमध्ये ग्रुप कॉलिंग आणि लाईट मोड फीचरवर काम करत आहे. लवकरच हे फीचर लाँच करण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. अँड्रॉईड पोलिसांच्या सोमवारच्या रिपोर्टनुसार सांगितले की, ड्युओ ग्रुप कॉलिंग फीचरची सर्वात जास्त मागणी युजर्सकडून करण्यात येत आहे. तसेच हे फीचर सध्या अॅपलच्या फोनमध्ये उपलब्ध आहे, यात एकाचवेळी 32 …

आता रात्री-बेरात्री गुगल ड्युओ वापरा

मुंबई : गुगल आपल्या व्हिडीओ चाटिंग अॅप ड्युओमध्ये ग्रुप कॉलिंग आणि लाईट मोड फीचरवर काम करत आहे. लवकरच हे फीचर लाँच करण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. अँड्रॉईड पोलिसांच्या सोमवारच्या रिपोर्टनुसार सांगितले की, ड्युओ ग्रुप कॉलिंग फीचरची सर्वात जास्त मागणी युजर्सकडून करण्यात येत आहे. तसेच हे फीचर सध्या अॅपलच्या फोनमध्ये उपलब्ध आहे, यात एकाचवेळी 32 युजर्स कॉलिंग करु शकतात.

युजर्सला या फीचरचा वापर करण्यासाठी ज्यांच्यासोबत व्हडीओ चाट करायची असेल त्या सर्वांच्या कॉन्टॅक्टचा एक ग्रुप बनवावा लागेल. यानंतर कॉल सुरु करु शकता. रिपोर्टनुसार सांगितले आहे की, कॉलच्या खाली उजव्या बाजूला कोपऱ्यात ग्रुप नाव असेल त्यावर क्लिक करुन युजर्स ग्रुपमधील सर्व सदस्यांची यादी पाहू शकतो.

नवीन लाईट मोडमुळे युजर्स रात्रीच्या वेळीही व्हिडीओ कॉलिंग करु शकतो. रात्रीच्या वेळेस कमी प्रकाश असणार अशा वेळी ही युजर्सला व्यवस्थित दिसेल अशा प्रकारचा हा नवीन लाईट मोड कंपनी लवकरच सुरु करणार आहे. आतापर्यंत हा फीचर कधीपर्यंत सुरु होईल याची अधिकृत माहिती दिलेली नाही. हे सामान्य युजर्सला डाउनलोडिंग करण्यासाठी उपलब्ध नाही आणि फक्त युजर्सवर याची टेस्ट केली जात आहे.

लो लाईट मोडवर गुगल ड्युओच्या व्यतिरीक्त व्हॉट्सअॅपही काम करत आहे. व्हॉट्सअॅप युजर्स या फीचरची वाट गेले काही महिने बघत आहे. हा फीचर युट्यूब आणि ट्विटरवर पहिल्यापासून उपलब्ध आहेत. तसेच ग्रुप कॉलिंगचा फीचरही व्हॉट्सअॅपवर पहिल्यापासून उपलब्ध आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *