तब्बल 48 मेगापिक्सेल कॅमेरा, रेडमीच्या नव्या फोनचा लाँचिंग मुहूर्त ठरला

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतात 20 मे रोजी रेडमी नोट 7 एस लाँच करणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारीमध्ये रेडमी नोट 7 आणि 7 प्रो लाँच केले होते. रेडमी नोट 7 आणि 7 प्रो स्मार्टफोनचे यश पाहून कंपनी आता रेडमी नोट 7 एस भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. …

तब्बल 48 मेगापिक्सेल कॅमेरा, रेडमीच्या नव्या फोनचा लाँचिंग मुहूर्त ठरला

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतात 20 मे रोजी रेडमी नोट 7 एस लाँच करणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारीमध्ये रेडमी नोट 7 आणि 7 प्रो लाँच केले होते. रेडमी नोट 7 आणि 7 प्रो स्मार्टफोनचे यश पाहून कंपनी आता रेडमी नोट 7 एस भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

“भारतातील रेडमीच्या चाहत्यांसाठी सुपर रेडमी नोट येत आहे. रेडमीच्या नव्या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे”, असं शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्वीट करत म्हटले.

नुकतेच रेडमी नोट 7 स्मार्टफोनला अंतराळात पाठवले होते आणि तेथून काही फोटोही काढण्यात आले होते. मनू जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरही हे फोटो शेअर केले होते. मात्र हे फोटो नेमके रेडमी नोट 7 मधून की रेडमी नोट 7 एस मधून क्लिक केले आहेत याबद्दल अजून स्पष्टीकरण मिळालेले नाही.

रेडमी नोट 7 एसबद्दल कंपनीने अजून काही डिटेल्स शेअर केलेले नाहीत. पण हा बजेट स्मार्टफोन आहे आणि यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेराही दिला जाऊ शकतो.

शाओमी लवकरच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरवाला स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्याचा टीजरही कंपनीने प्रसिद्ध केला आहे. पण हा फोन K20 असेल, असं म्हटलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *