लवकरच शाओमीचा सर्वात स्वस्त फोन लाँच होणार, पाहा किंमत

शाओमीचा सर्वात स्वस्त फोन येत्या 4 जुलै रोजी लाँच होणार आहे. शाओमी 'रेडमी 7ए' असं या मॉडलचं नाव आहे. शाओमी रेडमी 7ए 4 जुलै रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लवकरच शाओमीचा सर्वात स्वस्त फोन लाँच होणार, पाहा किंमत

मुंबई : शाओमीचा सर्वात स्वस्त फोन येत्या 4 जुलै रोजी लाँच होणार आहे. शाओमी ‘रेडमी 7ए’ असं या मॉडलचं नाव आहे. शाओमी रेडमी 7ए 4 जुलै रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ई-कॉमर्स कंपनीनेही यासाठी एक मायक्रोसाईट तयार केली आहे. मात्र याबद्दल अजून कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही.

फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटवर रेडमी 7ए ‘स्मार्ट देशाचा स्मार्ट फोन’ असं म्हटलं आहे. या फोनची किंमत आणि उपलब्धतेबद्दल काही माहिती दिलेली नाही. ऑनलाईन लिस्टिंगमध्ये फोनच्या लाँचिंग तारखेवर फोकस केलेला आहे. मायक्रोसाईटवर रेडमी 7ए च्या फास्ट प्रोसेसर, फेसबुक रेडी कॅमेरा आणि बॅटरीबद्दल माहिती दिलेली आहे.

शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन रेडमी 7ए च्या लाँच तारखेची माहिती दिली होती. पण अद्याप कंपनीच्या अकाऊंटवरुन अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.

शाओमीने रेडमी 7ए चीनमध्ये मे महिन्यात लाँच केला होता. यानंतर रेडमी 7ए भारतात लाँच करणार असल्याची चर्चा सुरु झाली. भारतात लाँच होणाऱ्या रेडमी 7ए मध्ये कंपनी एक खास फीचर देणार आहे. हे फीचर चीनच्या व्हेरिअंटमध्ये नाही. मनु कुमार जैन यांनीही फोनच्या फीचरबद्दल एक ट्वीट केले होते. दरम्यान, हे फीचर काय आहे, याबद्दल अजून सांगण्यात आलं नाही.

किंमत

शाओमी रेडमी 7ए स्मार्टफोन भारतात कोणत्या किंमतीवर लाँच केला जाईल याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. चीनमध्ये ज्या किंमतीत हा फोन उपलब्ध केला जात आहे, त्या किंमतीमध्ये भारतात फोन उपलब्ध केला जाईल, अस म्हटलं जात आहे. चीनमध्ये 7ए च्या 16 जीबी स्टोअरजे व्हेरिअंटची किंमत 549 युआन (5,500 रुपये) आणि 32 जीबी स्टोअरेज फोनची किंमत 599 युआन (6000 रुपये) आहे.

स्पेसिफिकेशन्स

  • 45 इंचाची एचडी स्क्रीन
  • 13 मेगापिक्सल बॅक कॅमेरा (एलईडी फ्लॅश)
  • 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा (AI फेस अनलॉक फीचर)
  • 2 जीबी मेमरी आणि 16/32 जीबी इंटरनल स्टोअरेज
  • स्नॅपड्रॅगन 439 एसओसी प्रोसेसर
  • अँड्रॉईड 8 पाय
  • 4,000mAh बॅटरी
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *