अमेझॉन फॅब फेस्टची तारीख जाहीर, 'या' स्मार्टफोनवर बंपर सूट

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेझॉन येत्या 10 जून ते 13 जून पर्यंत फॅब फोन फेस्टची सरुवात करत आहे. या दरम्यान अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे.

अमेझॉन फॅब फेस्टची तारीख जाहीर, 'या' स्मार्टफोनवर बंपर सूट

मुंबई : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेझॉन येत्या 10 जून ते 13 जून पर्यंत फॅब फोन फेस्टची सरुवात करत आहे. या दरम्यान अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे. यामध्ये अॅपल आयफोन एक्स आणि वनप्लस 6 टी फोनचाही समावेश असणार आहे.

अमेझॉन यावेळी एक्सचेंज ऑफरचीही सुविधा देत आहे. अमेझॉनवर iPhone X, OnePlus 6T, Samsung Galaxy M30 आणि Xiaomi Redmi Y3 च्या खेरदीवर सर्वाधिक आकर्षक ऑफर देण्यात आली आहे.

फेस्ट दरम्यान वनप्लस 6T च्या 8GB + 128GB व्हेरिअंट 41 हजार 999 रुपयात लाँच केला होता. आता तो फोन या फेस्टमध्ये 27 हजार 999 रुपयात मिळणार आहे.

वनप्लस 6T शिवाय, शाओमी रेडमी वाय 3, सॅमसंग गॅलेक्सी एम 30 ही अमेझॉन फेस्ट दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध असेल. अमेझॉनच्या विशेष सूचीमध्ये अॅपल आयफोन एक्सही असेल, या फोनची सुरुवात 90 हजार 900 रुपयांपासून असेल.

अमेझॉन बजेट स्मार्टफोन खरेदीवरही सूट देत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 20 फोन 10 हजार 990 रुपयात लाँच केला होता. हा फोन आता 9 हजार 990 रुपयात उपलब्ध आहे.

याशिवाय, अमेझॉनवर अनेक बजेट स्मार्टफोनवरही सूट दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, वीवो नेक्स, हुआवेई पी 30 प्रो आणि ओप्पो आर 17 हे स्मार्टफोनही या फेस्टमध्ये उपलब्ध आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *