तुम्हाला माहित आहे का? मृत झालेल्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटचे काय होते

दिवसाला मृत होत असलेल्या अनेकांची फेसबुकवर अकाऊंट आहेत. पण प्रत्येकजण आपला फेसबुक पासवर्ड खाजगी ठेवत असल्यामुळे मृत झालेल्या फेसबुक युजर्सची संख्या करोडोपर्यंत झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का ?, फेसबुकवर एक असा फीचर आहे, ज्यामुळे कुणाचा मृत्यू झाला, तर त्यानंतर त्या युजर्सच्या आठवणीत फेसबुकवर त्याची समाधी बनवली जाते.

तुम्हाला माहित आहे का? मृत झालेल्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटचे काय होते
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 8:07 PM

मुंबई : जगात दिवसाला अनेक जणांचा मृत्यू होत असतो. तसेच अनेक फेसबुक अॅडमिनचाही दिवसाला मृत्यू होत असतो. सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकजण फेसबुकचा वापर करत आहे. दिवसाला मृत होत असलेल्या अनेकांची फेसबुकवर अकाऊंट आहेत. पण प्रत्येकजण आपला फेसबुक पासवर्ड खाजगी ठेवत असल्यामुळे मृत झालेल्या फेसबुक युजर्सची संख्या करोडोपर्यंत झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का ?, फेसबुकवर एक असा फीचर आहे, ज्यामुळे कुणाचा मृत्यू झाला, तर त्यानंतर त्या युजर्सच्या आठवणीत फेसबुकवर त्याची समाधी बनवली जाते.

लिगेसी कॉन्टॅक्ट

फेसबुकवर आपल्या अकाऊंटच्या देखरेखीसाठी एक लिगेसी कॉन्टॅक्ट ठेवणे सर्वात चांगली कल्पना आहे. तुमचा लिगेसी कॉन्टॅक्ट तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अकाऊंट मॅनेज करु शकते आणि फ्रेन्ड रिक्वेस्टला उत्तर देऊ शकते. पण लिगेस कॉन्टॅक्टला तुमचे कोणतीही पोस्ट आणि मेसेज पाहण्याची परवानगी नसते. तुम्हाला हा पर्याय तुमच्या सिक्युरिटी ऑप्शनमध्ये मिळेल.

मृत झालेल्या लोकांच्या अकाऊंटचे फेसबुक काय करते ?

फेसबुक मृत लोकांच्या अकाऊंटला मेमोरियलाईज करते. म्हणजे त्यांचे अकाऊंट डिलीट होत नाही. लोक मृत व्यक्तीचे पोस्ट पाहून त्याची आठवण करु शकतील, यासाठी त्यांचे सर्व पोस्ट आणि फोटो फेसबुक जपून ठेवते. मेमेरियलाईज्ड अकाऊंटमध्ये व्यक्तीच्या नावापुढे रिमेंबरिंग जोडले जाते. जर मृत व्यक्तीने आपल्या टाईमलाईनवर इतरांना पोस्ट करण्यासाठी ओपन ठेवले असेल, तर लोक त्याच्या टाईमलाईनवर पोस्टही करु शकतात. मेमोरियलाईज्ड अकाऊंट ‘people you know म्हणजे ‘friend suggestion’ लिस्टमध्ये दिसतात. तसेच त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील सर्वांना त्यांच्या जन्म तारखेचे नोटिफिकेशन दिले जाते. याशिवाय, जर मृत व्यक्तीने असे कोणते पेज बनवलेले असेल, त्या पेजचा अॅडमिन तो एकटा असेल. तर मृत्यूची बातमी कळताच फेसबुककडून ते पेज डिलीट केले जाते. जर मृत व्यक्तीने लिगेसी कॉन्टॅक्ट केले असेल, तर अकाऊंटमध्ये बदल केला जाऊ शकतो.

अशी मिळते मृत लोकांची फेसबुकला माहिती?

लिगेसी कॉन्टॅक्टवरील पेजच्या शेवटी फेसबुक विचारते की, तुम्ही कोणत्या मृत व्यक्तीची माहिती फेसबुकला देऊ शकता?, त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही एका फॉर्मवर जाता, ज्या अकाऊंटच्या मालकाला तुम्हाला मृत घोषित करायचे असले, त्याआधी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. पण तुम्ही सहजपणे किंवा मस्तीमध्ये तुमच्या मित्राला मृत घोषित करु शकत नाही. यासाठी तुम्हाला मृत व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट अपलोड करावे लागणार आहे आणि ते व्हेरिफाय झाल्यानंतर फेसबुक त्या व्यक्तीला मृत घोषित करते.

याशिवाय तुम्हाला जर तुमचा मृत्यू झाला आणि तुमचे अकाऊंट कायमचे डिलीट करायचे असल्यास तुम्हाला ‘रिक्वेस्ट अकाऊंट डिलीशन सिलेक्ट’ करावे लागणार. या ऑप्शनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, तुम्ही गेल्यानंतरही फेसबुक कोणाला तुमचे मेसेज आणि लॉगईन करण्याची परवानगी देत नाही.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.