हरवलेला मोबाईल गुगल मॅपच्या सहाय्याने शोधण्यासाठी सोप्या टिप्स

मुंबई : आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. गरजेची कामं आजकाल स्मार्टफोनच्या मदतीने होत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला का? जर तुमचा स्मार्टफोन कुठे हरवला किंवा चोरी झाला तर तुम्ही काय कराल? आज आपल्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती, फोटो असतात. अशामध्चे जर फोन हरवला तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. …

google maps, हरवलेला मोबाईल गुगल मॅपच्या सहाय्याने शोधण्यासाठी सोप्या टिप्स

मुंबई : आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. गरजेची कामं आजकाल स्मार्टफोनच्या मदतीने होत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला का? जर तुमचा स्मार्टफोन कुठे हरवला किंवा चोरी झाला तर तुम्ही काय कराल? आज आपल्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती, फोटो असतात. अशामध्चे जर फोन हरवला तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. सध्या लोकांचे फोन चोरी किंवा हरवले तर लोक घाबरुन जातात. अशा परिस्थितीत त्यांना समजत नाही की काय करावं.

आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकबद्दल सांगणार आहोत की, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन सहज शोधून काढू शकता. अॅपलच्या ‘फाईंड माय फीचर’ सारखी सुविधा अँड्रॉईड आपल्या युजर्ससाठी आणत आहे. लवकरच अँड्रॉईड ‘फाईंड युअर फोन’ हे नवं फीचर देत आहे. हे फीचर आपल्या प्रत्येक हालचालींंवर नजर ठेवते आणि सर्व रेकॉर्ड आपल्याकडे सेव्ह ठेवते आणि गरज पडल्यास गुगल मॅपच्या मदतीने आपण आपल्या फोनचं लोकेशनही पाहू शकता.

google maps, हरवलेला मोबाईल गुगल मॅपच्या सहाय्याने शोधण्यासाठी सोप्या टिप्स

चला पाहूया हे फीचर कसं काम करतं.

सर्वात पहिले तुमच्याकडे दुसरा स्मार्टफोन किंवा कॉम्प्यूटर असणे गरजेचे आहे.

चांगल्या स्पीडचं इंटरनेट लागेल.

आपल्या गुगल अकाऊंटचं लॉग-इन आयडी आणि पासवर्ड लागेल.

 

या सोप्या स्टेप्स फॉल्लो करा

  • आपल्या स्मार्टफोन किंवा पीसीवर www.maps.google.co.in साईट ओपन करा.
  • यानंतर आपण हरवलेल्या स्मार्टफोनचं गुगल अकाऊंट यावर लॉग-ईन करा.
  • वरती उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये दिलेल्या तीन लाईनवर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला ‘युअर टाइमलाईन’चा पर्याय दिसेल, ते सिलेक्ट करा.
  • ज्या डिव्हाईसचे लोकेशन तुम्हाला पाहायचे असेल त्याचे वर्ष, महिना आणि दिनांक एंटर करा.
  • यानंतर गुगल मॅप्स तुम्हाला तुमच्या डिव्हाईसची लोकेशन हिस्ट्री समोर ठेवेल.
  • एवढेच नाही तर हे फीचर तुम्हाला तमुच्या करंट लोकेशनची सुद्धा माहिती देईल.
  •  जर तुम्हाला वाटतं हे फीचर तुमच्या डिव्हाईसवर व्यवस्थित काम करावं तर यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाईसचे लोकेशन सर्व्हिस ऑन करावे लागेल.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *