व्हॉट्सअपमध्ये त्रुटी शोधणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकचं खास गिफ्ट

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) मध्ये बग (त्रुटी) शोधून काढल्यामुळे एका भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकने खास गिफ्ट दिलं आहे.

व्हॉट्सअपमध्ये त्रुटी शोधणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकचं खास गिफ्ट

तिरुअनंतपुरम (केरळ) : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) मध्ये बग (त्रुटी) शोधून काढल्यामुळे एका भारतीय विद्यार्थ्याला फेसबुकने खास गिफ्ट दिलं आहे. केरळमधील एका 19 वर्षाच्या इंजीनियरिंग विद्यार्थाने व्हॉट्सअॅपमध्ये मेमरी करप्शन बग शोधून काढला आहे. या विद्यार्थ्याचे नाव के. एस. अनंतकृष्णा आणि तो बीटेकचा विद्यार्थी आहे. अनंतकृष्णाने जो बग शोधून काढला आहे, त्या बगमुळे कोणी दुसरा व्यक्ती तुमची व्हॉट्सअॅपवरील फाईल्स तुमच्या परवानगी शिवाय हटवू शकतो. ही कमजोरी शोधून काढल्यामुळे फेसबुकनेही या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.

अलपुझा येथे राहणाऱ्या अनंतकृष्णाने दोन महिन्यापूर्वी या बगचा शोध लावाला होता आणि याबद्दल व्हॉट्सअॅपवर मालकी हक्क असलेल्या फेसबुकच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. तसेच अनंतकृष्णाने या कमजोरीबद्दलचा उपायही अनंतकृष्णाने दिला आहे. फेसबुकनेही दिलेल्या उपायानुसार बग हटवण्यासाठी काम केले आणि बग पूर्णपणे हटवण्यात यश आल्यामुळे अनंतकृष्णाचा सत्कार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

अनंतकृष्णाला 500 डॉलर (34 हजार रुपये) नगद गिफ्ट दिलं आहे. तसेच फेसबुकने आपल्या प्रसिद्ध अशा हाल ऑफ फेममध्येही अनंतकृष्णाला जागा दिली आहे. फेसबुकच्या हाल ऑफ फेममध्ये अशा लोकांना जागा दिली जाते, जे त्यांच्या अॅपलीकेशनमधील बग शोधून काढतात.

फेसबुकच्या या वर्षाच्या यादीत अनंतकृष्णाला 80 व्या जागेवर स्थान मिळाले आहे. अनंतकृष्णा स्वत:ला इथिकल हॅकिंगमध्ये व्यस्त ठेवतो. त्याने केरळ पोलिसांच्या सायबरडॉमसोबतही काम केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *