फेसबुकवरुन चुकून मेसेज पाठवलात? नो टेन्शन...

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज  फेसबुकच्या माध्यामातून लाखो लोक एकमेकांशी चॅटिंग करत असतात. मात्र, ही चॅटिंग करताना प्रत्येकाला एका समस्येला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे एखादा मेसेज चुकून पाठवला आणि त्यामुळे अनेकांची गोची होते. यावर फेसबुकने तोडगा काढला आहे. व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता फेसबुकवरही पाठवेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुकच्या …

फेसबुकवरुन चुकून मेसेज पाठवलात? नो टेन्शन...

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज  फेसबुकच्या माध्यामातून लाखो लोक एकमेकांशी चॅटिंग करत असतात. मात्र, ही चॅटिंग करताना प्रत्येकाला एका समस्येला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे एखादा मेसेज चुकून पाठवला आणि त्यामुळे अनेकांची गोची होते. यावर फेसबुकने तोडगा काढला आहे.

व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता फेसबुकवरही पाठवेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरद्वारे ही सुविधा यूजर्सला मिळणार आहे. त्यामुळे परिणामी फेसबुक चँटिंग सोईस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

फेसबुक लवकरच मॅसेंजर अॅपवर ‘अनसेंड’ बटनची सुविधा देणार आहे. मेसेज पाठवल्यानंतर सुमारे 10 मिनिटांच्या आत हा मेसेज डिलीट करता येईल. सर्वप्रथम हा पर्याय जेन वाँग या यूजर्सने जगासमोर आणला होती. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकने ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकने प्रसिद्घपत्रकात जाहीर करुन याबाबतची माहिती दिली. फेसबुकच्या नवीन अपडेटमुळे iOS या मोबईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ही सुविधा मिळेल. यामुळे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ डिलीट करता येतील.

फेसबुकच्याच मालकीचे असणारे व्हॉट्सअॅप दिवसागणिक विविध अपडेट आणत असताना, फेसबुकने आपलं मॅसेंजर अॅपही अधिक सक्षम आणि यूजर फ्रेण्डली करण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाठवेलेला मेसेज डिलीट करण्याची सुविधा देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअॅपचं दिवाळी गिफ्ट, चार नवे फीचर्स

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *