शाओमीचा 'रेडमी नोट 6 प्रो' फक्त 11 रुपयात?

मुंबई : आपल्या मोबाईलवर नेहमीच वेगवेगळ्या ऑफरचे मेसेज येत असतात. कधी लाईफस्टाईलसंदर्भातील वस्तू, तर कधी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तर अगदी स्मार्टफोन किंवा इतर टेक्नोलॉजीच्या वस्तूंबद्दलही या ऑफर असतात. मात्र, या ऑफरमध्ये किती तथ्य असते, हे या मेसेजच्या खोलात गेल्यावरच आपल्या लक्षात येते. यातल्या निम्म्याहून अधिक ऑफर तर ग्राहकांना भुलवणाऱ्याच असतात. सध्या अनेकांच्या मोबाईलवर शाओमी या स्मार्टफोन …

शाओमीचा 'रेडमी नोट 6 प्रो' फक्त 11 रुपयात?

मुंबई : आपल्या मोबाईलवर नेहमीच वेगवेगळ्या ऑफरचे मेसेज येत असतात. कधी लाईफस्टाईलसंदर्भातील वस्तू, तर कधी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तर अगदी स्मार्टफोन किंवा इतर टेक्नोलॉजीच्या वस्तूंबद्दलही या ऑफर असतात. मात्र, या ऑफरमध्ये किती तथ्य असते, हे या मेसेजच्या खोलात गेल्यावरच आपल्या लक्षात येते. यातल्या निम्म्याहून अधिक ऑफर तर ग्राहकांना भुलवणाऱ्याच असतात. सध्या अनेकांच्या मोबाईलवर शाओमी या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीच्या नावे असाच मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये नेमकं काय आहे आणि याची सत्यता नेमकी किती आहे, हे आम्ही शोधलं आहे.

मेसेजमध्ये काय म्हटलंय?

“अभिनंदन, प्रिय ग्राहक! फक्त तुम्हाला शाओमीची ही खास ऑफर मिळत आहे. ज्या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला ‘रेडमी नोट 6 प्रो’ हा स्मार्टफोन केवळ 11 रुपयांना खरेदी करता येणार आहे.” अशा मजकुरासह एक लिंकही या मेसेजमध्ये दिली जाते आहे. ‘HP-MASALE’ असं मेसेज पाठवणाऱ्याचं नाव दिसतं.

शाओमी इंडियाकडून स्पष्टीकरण

‘रेडमी नोट 6 प्रो’ या स्मार्टफोनची ऑफर असल्याचे सांगणारा हा मेसेज खोटा असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे दस्तुरखुद्द शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनीच सांगितले आहे. त्याचं झालं असं की, जतन अगरवाल नामक व्यक्तीने ट्विटरवर शाओमीच्या नावाने आलेल्या ऑफरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आणि शाओमी इंडियाला टॅग केलं. त्यानंतर मनु कुमार जैन यांनी या ट्वीटला कोट करुन उत्तर दिले.

शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी म्हटलंय की, “This is fake! do NOT believe such msgs.”. याचाच अर्थ, शाओमीच्या नावाने ऑफरचे जे मेसेज पाठवले जात आहेत, त्यात तथ्य नाही.

एकंदरीत, शाओमीच्या नावाने ऑफरचे मेसेज पाठवले जात आहेत, ते खोटे असल्याचे स्वत: शाओमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला अशाप्रकारचे मेसेज आले असतील, त्यांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये.

‘शाओमी रेडमी नोट 6 प्रो’ स्मार्टफोन

शाओमीच्या ज्या स्मार्टफोनबद्दल ऑफरचे खोटे मेसेज पसरवले जात आहेत, त्या स्मार्टफोनचे फीचर्स काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

  • 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
  • 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
  • काळा, लाल, निळा आणि सोनेरी रंगांमध्ये हे व्हेरिएंट उपलब्ध
  • 6.26 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *