फ्लिपकार्टकडून स्मार्टफोनवर भरघोस सूट

मुंबई : तुम्ही जर मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंग आणि नोकिया स्मार्टफोनवर भरघोस सूट आणि सवलत मिळत आहे. 18 ते 19 डिसेंबरपर्यंत ही सवलत दिली जाणार आहे. सॅमसंग आणि नोकिया स्मार्टफोनवर ऑफर दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपनीने 2018 मध्ये लाँच झालेल्या सर्व …

फ्लिपकार्टकडून स्मार्टफोनवर भरघोस सूट

मुंबई : तुम्ही जर मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंग आणि नोकिया स्मार्टफोनवर भरघोस सूट आणि सवलत मिळत आहे. 18 ते 19 डिसेंबरपर्यंत ही सवलत दिली जाणार आहे.

सॅमसंग आणि नोकिया स्मार्टफोनवर ऑफर दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपनीने 2018 मध्ये लाँच झालेल्या सर्व डिव्हाईसवर भरघोस सूट दिली आहे. फ्लिपकार्टवर दिली जाणारी सवलत सर्वाधिक विक्री झालेल्या फोनवर मिळत आहे. तसेच यामध्ये फ्लॅगशिप हँडसेटचाही समावेश आहे. नोकिया, सॅमसंग, रेड मी, ओप्पोसह अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

2018 मध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोन्सवरील ऑफर्स

फ्लिपकार्टने 2018 मध्ये लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी 6, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लसवर सूट दिली आहे. हे तीन्ही स्मार्टफोन यावर्षी लाँच झाले होते. गॅलेक्सी 6 चा 4 जीबी रॅम व्हेरीएंट 9 हजार 990 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनवर 9 हजार 450 रुपयांचे एक्सचेंज ऑफर आहे. तसेच नो-कॉस्ट ईएमआय ऑफरही दिली जात आहे.

नोकिया 6.1 प्लस, 4 जीबी रॅम व्हेरीएंट 14 हजार 999 रुपयांत मिळत आहे. मात्र एक्सचेंज ऑफरवर 13 हजार 850 रुपयांची सूट मिळू शकते. त्याशिवाय नो कॉस्ट ईएमआय अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत पाच टक्के सूट मिळत आहे. कंपनी फोनवर 7 हजार 500 रुपये बायबॅक व्हॅल्यू देत आहे. तसेच एअरटेल सोबत फोन विकत घेतल्यास एक हजार रुपयांची कॅशबॅक आणि 240 जीबीचा मोफत डाटा मिळत आहे. यासाठी 199 रुपये, 249 रुपये, 448 रुपयेचा रिचार्ज करावा लागेल.

नोकिया 5.1 प्लसच्या 3 जीबी रॅम व्हेरिएंट 9 हजार 999 रुपयांवर खरेदी करु शकता. अॅक्सिस बँक कार्डचा वापर केला तर पाच टक्के सूट मिळेल. 99 रुपयांत फ्लिपकार्ट बायबॅक पॉलिसी घेतल्यावर 4 हजार 500 रुपयांची बायबॅक व्हॅल्यू मिळेल.

4 कॅमेराचा सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन 39 हजार 990 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर नो कॉस्ट ईएमआय आणि 18 हजार 900 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली आहे.  यासोबतच नोकिया 8, सॅमसंग गॅलेक्सी पोलरिश ब्ल्यू, गॅलेक्सी नोट 9, गॅलेक्सी ऑन मॅक्स आणि गॅलेक्सी ऑन फाय मोबाईलवर भरघोस सूट देण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *