फ्लिपकार्टवर अवघ्या 4,999 रुपयांमध्ये LED TV

एलईडी टीव्ही इतर टीव्ही प्रकारांच्या तुलनेत महाग असतात. मात्र, देशात पहिल्यांदाच सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात एलईडी टीव्ही मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर अवघ्या 4,999 रुपयांमध्ये LED TV

मुंबई : देशात सध्या एलईडी टीव्हीची क्रेझ आहे. एलईडी टीव्हीसाठी घरात जागा देखील कमी लागते. त्यामुळे सर्वाधिक ग्राहक खरेदी करताना एलईडी टीव्हीला पसंती देतात. एलईडी टीव्ही इतर टीव्ही प्रकारांच्या तुलनेत महाग असतात. मात्र, देशात पहिल्यांदाच सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात एलईडी टीव्ही मिळणार आहे. येत्या 19 जानेवारी ते 26 जानेवारी या काळात फ्लिपकार्टवर थॉमसन कंपनीची एलईडी टीव्ही (Thomson LED TV) फक्त 4,999 रुपयांमध्ये मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधत फ्लिपकार्ट 19 ते 26 जानेवारी दरम्यान विशेष सेल जारी करणार आहे. या आठवड्यात थॉमसन कंपनीची 24 इंच एलईडी टीव्ही 4,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. भारतात पहिल्यांदाच एलईडी टीव्ही 4,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. फ्लिकार्टवर या विशेष सेलची सुरुवात 19 जानेवारीपासून सुरु होत असली तरी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स ग्राहकांसाठी हा सेल 18 जानेवारी रात्री 8 वाजेपासून सुरु होणार आहे.

फ्लिपकार्टवर 4,999 रुपयांवर मिळणारी थॉमसन कंपनीची एलईडी टीव्ही ही 24 इंचची आहे. या टीव्हीची खरी किंमत 7,499 रुपये इतकी आहे. या टीव्हीला एका वर्षाची वॉरंटी असणार आहे.

फ्लिपकार्टच्या सेलवर थॉमसनच्या (Thomson LED TV) इतर टीव्ही मॉडेल्सवरही डिस्काउंट असणार आहे. थॉमसन कंपनीची 32 इंचची एचडी टीव्ही 6,999 रुपयांमध्ये असेल. या टीव्हीची खरी किंमत 7,999 रुपये इतकी आहे. याशिवाय थॉमसनच्या UD9 सीरीजच्या टीव्ही मॉडेल्सवरही ग्राहकांना डिस्काउंट मिळेल. थॉमसनची 43 इंच 4K UHD टीव्ही 20,999 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळेल. त्याचबरोबर थॉमसन कंपनीची 50 इंचची टीव्ही 19,499 रुपयांची असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *