गुगल पिक्सल 4 आणि 4 XL मध्ये 6 जीबी रॅम, 'या' महिन्यात लाँच होणार

गुगलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन पिक्सल 4 आणि पिक्सल 4 XL लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लिक झालेले आहेत.

गुगल पिक्सल 4 आणि 4 XL मध्ये 6 जीबी रॅम, 'या' महिन्यात लाँच होणार

नवी दिल्ली : गुगलचा (Google Pixel) बहुप्रतीक्षित स्मार्टफोन पिक्सल 4 आणि पिक्सल 4 XL लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लिक झालेले आहेत. हा फोन ऑक्टोबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 6 जीबी रॅमची सुविधा देण्यात आली आहे.

पिक्सल 3 आणि 3 XL मध्ये 4 जीबी रॅमसह 65 जीबी आणि 128 स्टोअरेज दिला होता. आतापर्यंत पिक्सलच्या सर्व मॉडेलच्या बॅक साईडवर सिंगल कॅमेरा सेंसर दिलेला होता. पण नव्या पिक्सल 4 मध्ये 6 जीबी रॅमसह बॅक साईडवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला असेल किंवा फ्रंटमध्ये 3 डी फेस अनलॉक फीचर असेल, असं सांगितलं जात आहे.

पिक्सल 4 मध्ये फ्रंट-फायरिंग स्पीकर्स हे फीचर उपलब्ध नसेल. डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट आणि अँड्रॉईड क्यू ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) असेल. गुगल पिक्सलचा हा पहिला फोन आहे, ज्यामध्ये एकापेक्षा अधिक रिअर कॅमेरे आहेत. फोनची डिझाईन पाहिली तर अनेकांनी या डिझाईनला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याचे फोटो व्हायरल होत असून अनेकजण गुगलच्या नव्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत.

पिक्सल 4 स्मार्टफोनमध्ये पांढरा आणि काळा असे दोन रंग उपलब्ध आहेत, असं सांगितलं जात आहे. या फोनच्या किंमतीबद्दलही अजून अधिकृतपणे सांगितलेले नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *