या '21' स्मार्टफोनला मिळणार नवीन अँड्रॉईड अपडेट, पाहा लिस्ट...

मुंबई : गुगलने दरवर्षी होणाऱ्या परिषदेत नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘Android Q’ च्या तिसऱ्या बीटाची घोषणा केली. Android Q गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नवं व्हर्जन आहे. सध्या जगभरात 2.5 अब्जाहून अधिक स्मार्टफोन अँड्रॉईंड सिस्टमवर चालतात. Android Q स्मार्टफोनमध्ये अपडेटेड नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अनडू अॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक फीचर …

या '21' स्मार्टफोनला मिळणार नवीन अँड्रॉईड अपडेट, पाहा लिस्ट...

मुंबई : गुगलने दरवर्षी होणाऱ्या परिषदेत नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘Android Q’ च्या तिसऱ्या बीटाची घोषणा केली. Android Q गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नवं व्हर्जन आहे. सध्या जगभरात 2.5 अब्जाहून अधिक स्मार्टफोन अँड्रॉईंड सिस्टमवर चालतात. Android Q स्मार्टफोनमध्ये अपडेटेड नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अनडू अॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक फीचर आहेत.

गुगल Android Q बीटा 3 ला आपल्या पिक्सल स्मार्टफोनशिवाय इतर 15 स्मार्टफोनमध्येही ही नवीन सिस्टम आणणार आहे. यानुसार एकूण 21 फोनमध्ये गुगलचा हा नवीन अँड्रॉईंड सिस्टम असेल. या अँडॉईंड सिस्टममुळे फोनमध्ये अनेक नवीन अपडेटही येणार आहेत.

भारतात ओरिओ (oreo) आणि पाय (Pie) या दोन अँड्रॉईड सिस्टमवर स्मार्टफोन चालत आहेत. तसेच यामध्ये अनेक नव-नवीन अपडेटही आले आहेत. मात्र आता गुगलने अँड्रॉईड क्यू लाँच केल्याने नक्कीच यूजर्सला हा नवीन अपडेट आवडेल.

हा नवीन अँड्रॉईड अपडेट तब्बल 21 नवीन फोनमध्ये मिळणार आहे. याफोनची यादी आपण खाली पाहू शकता.

 • Google Pixel 3 and 3XL
 • Google Pixel 2 and 2XL
 • Google Pixel and XL
 • Realme 3 pro
 • Oneplus 6T
 • Nokia 8.1
 • Asus zenFone 5Z
 • Huawei Mate 20 Pro
 • Tecno spark 3 pro
 • VIVO Nex s, Nex A and x27
 • Sony xperia xz3
 • oppo reno
 • xiaomi mi 9, Mi X 35G
 • LG G8 ThinQ
 • Esencial phone
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *