सुंदर मी होणार... आकर्षक दिसण्यासाठी कॅमेरा फिल्टर्सचा वापर करण्यात भारतीय महिला आघाडीवर

सुंदर दिसण्यासाठी भारतीय महिला कॅमेरा फिल्टर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, असा निश्कर्ष गुगलच्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.

सुंदर मी होणार... आकर्षक दिसण्यासाठी कॅमेरा फिल्टर्सचा वापर करण्यात भारतीय महिला आघाडीवर

मुंबई : गुगलने केलेल्या एका अभ्यासानुसार (Google study) चांगले सेल्फी फोटो/व्हिडीओ काढण्यासाठी अमेरिका आणि भारतात फिल्टरचा (फोटो अधिक सुंदर बनवण्यासाठीचं कॅमेरामधील फिचर अथवा तत्सम अॅप्स) सर्वाधिक वापर केला जातो. तसेच या सर्वेक्षणानुसार, फिल्टरच्या (Camera Filters) वापरामुळे लहान मुलांवरील परिणामांबाबत भारतीयांनी बिलकुल चिंता व्यक्त केलेली नाही. (Google study reveals Most of Indian women uses camera filters to look attractive)

70 टक्क्यांहून अधिक फोटो फ्रंट कॅमेऱ्याने काढले जातात.

रिसर्च रिपोर्टनुसार अँड्रॉयड फोनद्वारे जितके फोटो काढले जातात त्यापैकी 70 ट्क्क्यांहून अधिक फोटो हे फ्रंट कॅमेऱ्याद्वारे काढले जातात. भारतीय युजर्स सेल्फी काढण्यास आणि ते शेअर करण्यास प्राधान्य देतात. तसेच आपण अधिक सुंदर दिसावं यासाठी भारतीय युजर्स फिल्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यातही प्रामुख्याने भातीय महिला आघाडीवर आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय महिला स्वतःचे फोटो अधिक सुंदर बनावे यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच त्या मोठ्या प्रमाणात फिल्टर अॅप आणि एडिटिंग टूल्सचा वापर करतात. भारतात पिक्स आर्ट आणि मेकअप प्लस या एडिटिंग अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर 29 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणी स्नॅपचॅटचा वापर अधिक करतात.

फिल्टर्सच्या वापरात पुरुषसुद्धा मागे नाहीत

रिसर्चमध्ये म्हटले आहे की, सेल्फी काढणे आणि तो शेअर करणे भारतीय महिलांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. याचा त्यांचा व्यवहार आणि घरगुती अर्थशास्त्रावर परिणाम होतो. यात असे म्हटले आहे की, अनेक महिला सेल्फी घेण्यासाठी मेकअप आणि कपड्यांसाठी वेळ घालवतात. सेल्फी काढणे आणि फिल्टर्सचा वापर करण्याच्या बाबतीत भारतीय पुरुषही मागे नाहीत. परंतु भारतीय पुरुषांना त्या फोटोमध्ये ते कसे दिसतात यापेक्षा आजूबाजूच्या गोष्टींचं महत्त्व अधिक आहे. तसेच मोबाईलच्या रियर कॅमेराने फोटो काढतानाही फिल्टर्सचा वापर करतात.

रिपोर्टनुसार लहान मुलांनी फिल्टर्सचा वापर करण्याबाबत भारतीय पालकांची प्रतिक्रिया खूपच सामान्य वाटली. लहान मुलांवर त्याचे चांगले-वाईट परिणाम होतील किंवा होणार नाहीत, याबाबत ते कोणताही विचार करत नाहीत, असे जाणवले. त्यांच्यासाठी ही टाईमपासची गोष्ट आहे. भारतीय पालक मुलांकडून होणारा मोबाईलचा अधिक वापर, गोपनियता, आणि स्मार्टफोनची सुरक्षा याबाबत अधिक चिंतेत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

इतर बातम्या

Skin Care Tips | हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ सवयी गरजेच्या!

Instagram अकाउंट Facebook पासून वेगळं करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

(Google study reveals Most of Indian women uses camera filters to look attractive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *