तुम्ही दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स पाहिलंय हे ‘त्यांना’ कळणारही नाही, भन्नाट ट्रिक

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने 2018 मध्ये स्टेटस फिटर लाँच केलं होतं. सुरुवातीला हे फिचर अनेकांना आवडलं नाही, परंतु आता अनेकांचं हे सर्वात आवडतं फिचर बनलं आहे.

तुम्ही दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स पाहिलंय हे 'त्यांना' कळणारही नाही, भन्नाट ट्रिक
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 10:54 AM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने 2018 मध्ये स्टेटस फिचर लाँच केलं होतं. सुरुवातीला हे फिचर अनेकांना आवडलं नाही, परंतु आता अनेकांचं हे सर्वात आवडतं फिचर बनलं आहे. लोक या फिचरचा वापर त्यांच्या भावना शेअर करण्यासाठी करु लागले आहेत. फोटो, व्हिडीओ किंवा टेक्स्टच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप युजर्स त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. हल्ली तर या फिचरचा वापर करुन लोकांनी व्यवसायदेखील सुरु केले आहेत. स्टेटस अपलोड केल्यानंतर पुढील 24 तास हे स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसतं. त्यानंतर आपोआप रिमूव्ह होतं. (here is how you can see other peoples Whatsapp Status without letting them know)

अनेकदा असं होतं की आपल्याला एखाद्या युजरचं स्टेटस पाहायचं असतं, परंतु त्या व्यक्तीला कळू द्यायचं नसतं की, आपण त्यांचं स्टेटस पाहिलंय. अनेकांना तसं करता येत नाही. परंतु आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणाचंही स्टेटस पाहू शकता आणि त्या व्यक्तीला कळणारही नाही, की आपण तिचं स्टेटस पाहिलंय.

Read receipts टर्न ऑफ

तुम्हाला लोकांचं स्टेटस पाहायचं आहे, परंतु लोकांना हे कळू द्यायचं नसेल तर तुम्हाला WhatsApp वरील फिचर Read receipts टर्न ऑफ करावं लागेल. Read receipts बंद करण्यासाठी WhatsApp प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जा आणि तिथे Read receipt चा टॉगल दिसेल तो बंद करा. असं केल्यानंतर तुम्ही कोणाचंही स्टेटस पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्टेटस व्ह्यू लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला कळणारच नाही की, तुम्ही त्यांचं स्टेटस पाहिलं आहे.

तुम्हालाही दुसऱ्यांचे अपडेट समजणार नाही

दरम्यान, या फिचरचा वापर करत असताना तुम्ही जेव्हा कोणालाही मेसेज कराल तेव्हा त्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही हे तुम्हाला समजणार नाही. कारण Read receipt चा पर्याय बंद ठेवल्याने तुम्हाल मेसेजखाली दिसणारी ब्लू टिक दिसणार नाही. तसेच जर कोणत्याही युजरने तुम्हाला मेसेज पाठवला असेल आणि तुम्ही तो वाचला, तरीदेखील त्या युजरला कळणार नाही, की तुम्ही त्याचा मेसेज वाचला आहे, आणि त्यालाही ब्लू टिक दिसणार नाही. त्यामुळे या Read receipts ट्रिकचा जसा आपल्याला फायदा होतो, त्याचप्रमाणे हे पर्याय बंद ठेवल्यास आपला तोटादेखील होतो.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही ट्रिक वापरा

WhatsApp चं एक असं फिचर आहे जे काही युजर्सना आवडत नाही अथवा त्यामध्ये नवीन अपडेटची मागणी केली जाते. या फिचरचं नाव आहे डिलीट फॉर एव्हरीवन (Delete for everyone). या फिचरद्वारे कोणताही युजर मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज डिलीट करु शकतो. अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तो मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सुक असतो. परंतु WhatsApp मध्ये असं कोणतंही फिचर नाही, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकतो. परंतु आम्ही तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज मिळवू शकता.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावं लागेल. दरम्यान तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की, WhatsApp अशा कोणत्याही गोष्टीला प्रमोट करत नाही. तसेच या थर्ड पार्टी अ‍ॅपचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही या ट्रिकचा वापर करायला हवा.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज मिळवण्याची ट्रिक

1. डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागेल. 2. WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स अॅक्सेप्ट कराव्या लागतील. 3. अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल. 4. त्यानंतर तुम्ही असे अ‍ॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत. 5. यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा. तसेच तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचाही पर्याय दिसेल. तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता. 6. आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.

गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. परंतु हे अॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही अॅप उबलब्ध नाही.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर

 (heres how you can see other peoples Whatsapp Status without letting them know)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.