व्हॉट्सअॅपचं बहुचर्चित स्टीकर फीचर कसं वापराल?

मुंबई : व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी मच अवेटेड फीचर अखेर लाँच केलं आहे. यामुळे युझर्स आता स्टीकरही पाठवू शकतात. ऐन दिवाळीच्या वेळी हे फीचर आल्यामुळे सध्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी या फीचरचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. अँड्रॉईड आणि आयओएससाठी असणाऱ्या या फीचरचा सध्या व्हॉट्सअॅपवर धुमाकूळ सुरु आहे. अनेकांच्या फोनवर हे फीचर आलंय, मात्र ते वापरायचं कसं हे तुम्हाला …

व्हॉट्सअॅपचं बहुचर्चित स्टीकर फीचर कसं वापराल?

मुंबई : व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी मच अवेटेड फीचर अखेर लाँच केलं आहे. यामुळे युझर्स आता स्टीकरही पाठवू शकतात. ऐन दिवाळीच्या वेळी हे फीचर आल्यामुळे सध्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी या फीचरचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. अँड्रॉईड आणि आयओएससाठी असणाऱ्या या फीचरचा सध्या व्हॉट्सअॅपवर धुमाकूळ सुरु आहे.

अनेकांच्या फोनवर हे फीचर आलंय, मात्र ते वापरायचं कसं हे तुम्हाला अद्याप समजलं नसेल तर ते कसं वापरायचं ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचं 2.18 किंवा त्याच्या पुढचं व्हर्जन असणं गरजेचं आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असावं.

स्टीकर फीचर कसं वापराल?

व्हॉट्सअॅप चालू केल्यानंतर ज्या युजरला स्टीकर पाठवायचं आहे, त्या चॅटमध्ये जा. यानंतर तुम्हाला इमोजी, जीफ आणि स्टीकर असे तीन ऑप्शन दिसतील. स्टीकरमध्ये गेल्यानंतर ते डाऊनलोड करा. आपल्याला हवं ते स्टीकर डाऊनलोड करुन पाठवता येईल.

अॅपल युजर्स राईट कॉर्नरला स्टीकर बॉक्स निवडू शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *