HTC चा ट्रिपल कॅमेराचा फोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर

मोबाईल इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी HTC ने आपला नवीन मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. Wildfire X असं या नव्या मॉडलचं नाव आहे.

HTC चा ट्रिपल कॅमेराचा फोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर

मुंबई : मोबाईल इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी HTC ने नवीन मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. Wildfire X असं या नव्या मॉडलचं नाव आहे. पहिल्यापासून असा अंदाज लावला जात होता की, कंपनी HTC Desire 19+ स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यापूर्वीही हा स्मार्टफोन थायवानमध्ये लाँच केला होता.

या नवीन फोनचा बेस व्हेरिअंट 9 हजार 999 रुपयामध्ये मिळतो. HTC ने स्वस्त किंमतीत क्वॉड कॅमेरा असलेला फोन भारतात लाँच केला आहे. तसेच हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे.

फीचर

HTC Wildfire X मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि 720 x 1520 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.22 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये IPS डिस्प्लेचाही समावेश आहे. यामुळे धुळ आणि इतर द्रव्य पदार्थापासून फोन खराब होण्यापासून सुरक्षित राहतो. फोनमध्ये 12nm 2.0 GHz प्रोसेसर आणि 3D OPVD मिरर फिनिश डिजाइन आहे. याशिवाय प्री-लोडेड ‘Mybuddy’ फीचर दिला आहे. यामुळे युजर्सला पर्सनल सिक्युरिटी प्रोव्हाईड केली जाईल.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर आणि एक फ्रंट कॅमेरे आहेत. फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल, सेकेंडरी 8 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. विशेष म्हणजे हा फोनमध्ये 8X पर्यंत हायब्रिड झूम करता येते. तसेच LED फ्लॅशही देण्यात आला आहे.

स्टोअरेज

3GB+32GB आणि 4GB+128GB मध्ये दोन व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत तुम्ही वाढवू शकता. स्मार्टफोनमध्ये USB C Type चार्जिंग दिले आहे. जे 10w फास्ट चालते. फोनमध्ये 3300 एमएएच बॅटरी क्षमता आहे.

किंमत

फोनच्या बेस व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. Flipkart वर HTC Wildfire X ची किंमत 10 हजार 999 रुपये आणि दुसरा व्हेरिअंट 13 हजार 999 रुपयात मिळत आहे. दरम्यान, युजर्सला लाँच ऑफरमध्ये 1 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट दिला जात आहे. स्मार्टफोनचा पहिला सेल 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Vodafone Idea युजर्सला 3 हजार 750 पर्यंत बेनिफिट आणि 18 महिन्यांसाठी 500MB फ्री डेटा ऑफर दिला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *