तब्बल 9 तासांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप पूर्ववत

जगभरात सोशल मीडिया युजर्सचा जीव की प्राण असलेले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम हे अॅप तब्बल 9 तासांनी पुन्हा पूर्ववत झाले आहे. यामुळे सर्व सोशल मीडिया युजर्सने सुटकेचा श्वास सोडला आहे.

तब्बल 9 तासांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप पूर्ववत
Follow us
| Updated on: Jul 04, 2019 | 8:12 AM

facebook down मुंबई : जगभरात सोशल मीडिया युजर्सचा जीव की प्राण असलेले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम हे अॅप तब्बल 9 तासांनी पुन्हा पूर्ववत झाले आहे. यामुळे सर्व सोशल मीडिया युजर्सने सुटकेचा श्वास सोडला आहे. बुधवारी (3 जुलै) संध्याकाळच्या सुमारास काहींना फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर फोटो लोड होण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ट्विटवर तक्रारीचा अक्षरश: पाऊस पडला.

मात्र त्यानंतर आज (4 जुलै) पहाटे डाऊन झालेले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम हे अप पुन्हा पूर्ववत झाले आहेत. “काल काहींना फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्स पाठवताना आणि डाऊनलोड होताना तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नुकतंच आम्ही ही समस्या सोडवली आहे. त्यामुळे तुम्ही आता पहिल्यासारखंच फोटो, व्हिडीओ आणि इतर गोष्टी डाऊनलोड करु शकता, असे ट्विट फेसबुकने अधिकृतरित्या केले आहे.”

भारतात सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक होतो. त्यातही भारतात व्हॉट्सअपचे हजारो युजर्स आहेत. मात्र काल अचानक अनेकांचं फेसबुक लॉग इन किंवा फोटो लोड होण्यास अडथळा निर्माण झाला. तर काहींना इंस्टाग्रामवर फोटो डाऊनलोड होण्यास अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्हॉट्सअप या सोशल मीडिया अपवरही फोटो डाऊनलोड होत नव्हते. आधी सर्वांना नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असावा, असे वाटले. मात्र त्यानंतर बराच उशीरापर्यंत ही समस्या दूर होत  नसल्याने अनेकांनी ट्विटरवर तक्रारी करण्यास सुरुवात केली.

काही लोकांना फेसबुकद्वारे फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्स पाठवण्यात समस्या निर्माण  होत आहे. या समस्येबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. असे ट्विट फेसबुकने स्वत:च्या अधिकृत ट्विटवरुन केल होते. त्याशिवाय लवकरात लवकर आम्ही ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु असेही फेसबुकने ट्विट केले होते. त्यानंतर तब्बल 9 तासांनी फेसबुकने युजर्सला निर्माण झालेली ही समस्या सोडवली आहे.

संबंधित बातम्या : 

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन, फोटो लोड होण्यास अडथळा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.