इन्स्टाग्राम आता खासगीपणा जपणार, नवीन फीचर लॉन्च

मुंबई: फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन आलं आहे. या फीचरच्या माध्यामातून आता युजर्सला आपल्या जवळच्या मित्रांसोबत काही खास फोटो शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर आता प्रायव्हसीही मेंटेन करता येणार आहे. इन्स्टाग्रामने या फीचरची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून केली, पण त्यामध्ये पर्सनलचा पर्याय नव्हता. मात्र नवीन फीचरच्या माध्यामातून आता युजर्स …

इन्स्टाग्राम आता खासगीपणा जपणार, नवीन फीचर लॉन्च

मुंबई: फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन आलं आहे. या फीचरच्या माध्यामातून आता युजर्सला आपल्या जवळच्या मित्रांसोबत काही खास फोटो शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर आता प्रायव्हसीही मेंटेन करता येणार आहे.

इन्स्टाग्रामने या फीचरची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून केली, पण त्यामध्ये पर्सनलचा पर्याय नव्हता. मात्र नवीन फीचरच्या माध्यामातून आता युजर्स आपल्या जवळच्या मित्रांसोबत फोटो शेअर करु शकतो. याआधी फोटो शेअर केल्यावर ते सर्व युजर्सपर्यंत पोहोचायचे, पण आता काही ठारविक तुमच्या जवळील मित्रांसोबतच हा फोटो शेअर होणार आहे. असा पर्याय इन्स्टाग्रामने युजर्ससाठी उपलब्ध करुन दिला आहे. हे फीचर सध्या आयओएस आणि अँड्रॉईडसाठी उपलब्ध आहे.

नवीन फीचरचा फायदा घेण्यासाठी युजर्सला आपल्या प्रोफाईलच्या टॉपवर ‘क्लोज फ्रेंड्स’ पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपण जेव्हा स्टोरी ठेवू, तेव्हा ते फक्त तुम्ही निवडलेल्या ठाराविक मित्रांना दिसेल, बाकी कुणालाही दिसणार नाही.

क्लोज फ्रेंड्स लिस्टमध्ये युजर्स फक्त आपल्या आवडीच्या लोकांना अॅड करु शकतो. कुणाच्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये कुणाचा समावेश आहे, हे फक्त युजर्सलाच कळू शकते.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *