आता स्मार्टफोनची घडी करुन खिशात ठेवा!

मुंबई : सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनची चर्चा सुरु असतानाच एलजीच्या स्मार्टफोनची चर्चा जोरात सुरु झाली आहे. एलजी पुढच्या वर्षी म्हणजे 2019 साली आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसाधारण स्मार्टफोनपेक्षाही भन्नाट फीचर्ससह एलजीचा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. त्यामुळे एकतर फोल्डेबल म्हणून विशेष आकर्षण, त्यात विविध फीचर्समुळे आणखी आकर्षण, असे दुहेरी आकर्षण या स्मार्टफोनमध्ये असेल. …

आता स्मार्टफोनची घडी करुन खिशात ठेवा!

मुंबई : सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनची चर्चा सुरु असतानाच एलजीच्या स्मार्टफोनची चर्चा जोरात सुरु झाली आहे. एलजी पुढच्या वर्षी म्हणजे 2019 साली आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसाधारण स्मार्टफोनपेक्षाही भन्नाट फीचर्ससह एलजीचा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. त्यामुळे एकतर फोल्डेबल म्हणून विशेष आकर्षण, त्यात विविध फीचर्समुळे आणखी आकर्षण, असे दुहेरी आकर्षण या स्मार्टफोनमध्ये असेल. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमींच्या नजरा एलजीच्या या फोल्डेबल स्मार्टफोनकडे लागल्या आहेत.

स्मार्टफोन बाजारात आतापर्यंत सॅमसंग, ह्युवेई, मायक्रोसॉफ्ट, शाओमी यांच्या फोल्डेबल स्मार्टफोनचीच जोरदार चर्चा सुरु होती. त्यातही सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या चर्चा तर थेट लॉन्चिंगपर्यंत झाल्या होत्या. मात्र, या सगळ्यात एलजी कंपनीच बाजी मारणार असल्याचे दिसते आहे.

साऊथ कोरियन कंपनी असलेल्या एलजीने आपला फोल्डेबल स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्तही जवळपास निश्चिक केला आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2019 साली होणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये एलजी आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे.

जगभरातील तंत्रज्ञानासंदर्भात इत्यंभूत माहिती देणाऱ्या फिलाडेल्फिया येथील इव्हान ब्लास यांनी सॅमसंगच्या संदर्भाने ट्वीट केले आहे. सॅमसंगबाबत मी काहीही बोलू शकत नाही. मात्र, पुढच्या वर्षी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये एलजी कंपनी आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याचं विचार करत आहे., असे इव्हान ब्लास यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले.

एलजीच्या या फोल्डेबल स्मार्टफोनची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. कोणते फीचर्स असतील, कोणत्या नव्या गोष्टी असतील, आकर्षक काय असेल इत्यादी सर्व गोष्टी अद्याप उघड करण्यात आल्या नसल्या, तरी अत्याधुनिक फीचर्ससह हा स्मार्टफोन बाजारात आणला जाईल आणि तेही इतर स्पर्धक कंपन्यांच्या आधी, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, सॅमसंग तर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सातत्याने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबत काही ना काही पोस्ट करत आहे. मात्र, नेमके कधी लॉन्च केले जाईल, याबाबत नेमकी माहिती अद्याप देत नाहीत. त्यामुळे सॅमसंग किंवा इतर कंपन्यांआधी साऊथ कोरियन कंपनी असलेली एलजी कंपनी बाजी मारणार असल्याचेच चिन्ह दिसत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *