मारुती वॅगन आरच्या नव्या मॉडेलचा फोटो लिक

मुंबई : मारुती सुजुकीची मोस्ट पॉपुलर वॅगन आर कार नवीन लुक आणि शानदार फीचर्ससह रिलाँच होत आहे. कंपनी ही नवीन कार 23 जानेवारीला लाँच करत आहे. मात्र कार लाँचिंग होण्याआधीच या कारचे फोटो आणि माहिती लिक झाली आहे. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. नवीन डिझाईन नवीन कारच्या डिझाईनबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. …

मारुती वॅगन आरच्या नव्या मॉडेलचा फोटो लिक

मुंबई : मारुती सुजुकीची मोस्ट पॉपुलर वॅगन आर कार नवीन लुक आणि शानदार फीचर्ससह रिलाँच होत आहे. कंपनी ही नवीन कार 23 जानेवारीला लाँच करत आहे. मात्र कार लाँचिंग होण्याआधीच या कारचे फोटो आणि माहिती लिक झाली आहे. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

नवीन डिझाईन

नवीन कारच्या डिझाईनबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. नव्या वॅगन आरचा लुक जपानमध्ये असलेल्या वॅगन आर मॉडेल सारखा आहे असं सांगितलं जात आहे. मात्र लिक झालेला फोटो पाहून वॅगन आर कार जपानच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. नवीन मॉडेलमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आला असून गाडीची फ्रंट ग्रील लांब आणि आकर्षक आहे. नवीन कारचे हेडलॅम्प्स पहिल्यापेक्षा अधिक मोठे आहेत. तसेच फॉग लाईटही अपग्रेड केली आहे. कारची लांबी 3,655 mm, लांबी, 1,620 mm उंच आहे. या गाडीमध्ये 32 लीटरचा पेट्रोल टँक दिला आहे.

इंजिन आणि स्पेसिफिकेशन

नवीन वॅगन आर डॅशबोर्ड रनिंग मॉडेलसारखाच आहे. मात्र यामध्ये टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि रिवाइज्ड इंस्ट्रूमेंट पॅनल लावण्यात आले आहे. तसेच स्टेअरिंग व्हीलवर सिल्व्हर फिनिशिंग देण्यात आली आहे. स्टेअरिंग व्हीलमध्ये ऑडियो आणि फोन कंट्रोलची सुविधा दिली आहे.

 

वॅगनरमध्ये 1.0 लीटर, 3 सिलेंडर K-Series चा पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 67 Bhp पॉवर आणि 90 Nm चा टॉर्क जनरेट करतात. कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गेअर आणि AMT व्हेरिऐंटमध्ये उपलब्ध आहेत. कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स, रिव्हर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट, सीटबेल्ट रिमाइंडरसोबत ABS सारखे सेफ्टी फीचर्स आहेत. तसेच इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससोबत आउट साईड रिअर व्ह्यू मिरर (ORVM) दिले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *