नोकियाचे दोन स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा फीचर आणि किंमत

मुंबई : HMD ग्लोबलने Nokia 5.1 Plus स्मार्टफोनचे दोन व्हेरिअंट भारतात लाँच केले आहेत. यामध्ये 4GB/6GB रॅम आणि 64GB स्टोअरेज असलेले असे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. Nokia 5.1 Plus ची पहिली विक्री गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती.  लाँचच्या दरम्यान हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.1 ओरिओवर चालत होता. आता हा अँड्रॉईड 9.0 वर चालत आहे. हा …

नोकियाचे दोन स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा फीचर आणि किंमत

मुंबई : HMD ग्लोबलने Nokia 5.1 Plus स्मार्टफोनचे दोन व्हेरिअंट भारतात लाँच केले आहेत. यामध्ये 4GB/6GB रॅम आणि 64GB स्टोअरेज असलेले असे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. Nokia 5.1 Plus ची पहिली विक्री गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती.  लाँचच्या दरम्यान हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.1 ओरिओवर चालत होता. आता हा अँड्रॉईड 9.0 वर चालत आहे. हा एक अँड्रॉईड वन स्मार्टफोन आहे आणि यामध्ये गुगल लेन्स, मल्टीटास्किंगसाठी पिक्चर-इन-पिक्चर, गुगल प्ले आणि बॅटरी सेव्हिंग फीचर्स दिले आहेत.

Nokia 5.1 Plus च्या नवीन व्हेरिअंटच्या विक्रीची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या फोनची ऑनलाईन विक्री Nokia.com/phones वर केली जाईल. यासोबतच 12 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन ग्लास ब्लॅक, ग्लास व्हाईट आणि ग्लास मिडनाईटमध्ये अशा तीन रंगात ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

Nokia 5.1 Plus च्या नवीन स्मार्टफोनच्या 6GB रॅम/64GB स्टोअरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोअरेज असलेल्या व्हेरिएटची किंमत 14,499 रुपये आहे. लाँच ऑफरमध्ये एअरटेल ग्राहकांना या फोनवर 2 हजार रुपयांची इन्स्टंट कॅशबॅक आणि 199 रुपये, 249 रुपये आणि 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 महिन्यांपर्यंत 240GB डेटा मिळेल.

Nokia 5.1 Plus स्पेसिफिकेशन्स

Nokia 5.1 Plus हायब्रिड सिम स्लॉट

5.86 इंच आकाराचा डिस्प्ले

MediaTek Helio P60 प्रोसेसर

ड्युअल कॅमेरा सेटअप

रिअर कॅमेरा 13+5 मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल

3,060mAh बॅटरी क्षमता

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *