ओला आता महिन्याभरासाठी गाडी भाड्यावर देणार

मुंबई : अॅप्लिकेशनवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ कंपनीच्या ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज युनिटला पुढील दोन वर्षांत 50 कोटी डॉलरचा आर्थिक पुरवठा होईल. ग्राहकांना स्वत: वाहन चालवता यावं, अशी सेवा ओला सुरु करणार आहे. त्यासाठी हा आर्थिक पुरवठा करण्यात येत आहे. ओला फ्लीट टेक्नॉलॉजीजच्या इक्विटी आणि बँडच्या संयोजनाद्वारे 50 कोटी डॉलर ओला कंपनीला मिळेल. कंपनीला या …

Ola Taxi, ओला आता महिन्याभरासाठी गाडी भाड्यावर देणार

मुंबई : अॅप्लिकेशनवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ कंपनीच्या ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज युनिटला पुढील दोन वर्षांत 50 कोटी डॉलरचा आर्थिक पुरवठा होईल. ग्राहकांना स्वत: वाहन चालवता यावं, अशी सेवा ओला सुरु करणार आहे. त्यासाठी हा आर्थिक पुरवठा करण्यात येत आहे. ओला फ्लीट टेक्नॉलॉजीजच्या इक्विटी आणि बँडच्या संयोजनाद्वारे 50 कोटी डॉलर ओला कंपनीला मिळेल. कंपनीला या पैशांतून देशात स्व-वाहन चालवण्याची सेवा सुरु करायची आहे. याला ‘ओला सेल्फी ड्राईव्ह’ असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत ग्राहकांना ओला गाड्या स्वत: चालवता येणार आहेत. त्यासाठी ग्राहक महिन्याभरासाठीही गाडी भाड्यावर घेऊ शकतील.

सध्या ही सेवा बंगळुरुत सुरु करण्यात आली आहे. बंगळुरु येथील ओला कंपनी या सेवेसाठी 10 हजार वाहनं लावण्याची शक्यता आहे. ओला सेल्फी ड्राईव्ह या सेवेला ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार वेगवेगळ्या प्रकारांत सुरु केलं जाईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. पुढील काही आठवड्यात ही सेवा देशभरात सुरु होण्याची शक्यता आहे.

या सेवेसाठी कंपनीला ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज आर्थिक पुरवठा करेल. या सेवेसाठी कंपनीने ह्युंदाई मोटर्स आणि किआ मोटर्स कॉरपोरेशनसोबत करार केला आहे. यानुसार, या कंपन्या जागतिक बाजारात ई-वाहन प्रणाली आणि टॅक्सी सेवा विकसित करतील, असे या कंपन्यानी सांगितलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *