एका वर्षात गुगल बंद करणार ही सेवा!

मुंबई : गुगल हे जगभरातलं लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आता मात्र, गुगलकडून लवकरच एक सेवा बंद केली जाणार आहे. 9to5Google ने दिलेल्या माहितीनुसार, गुगलचं लोकप्रिय चॅटिंग अॅप ‘हँगआउट’ची सेवा 2020 नंतर बंद केली जाणार आहे. अर्थात वर्षभरानंतर गुगलचं ‘हँगआउट’ बंद होईल. गुगलने 2013 साली आपल्या युजर्ससाठी ‘हँगआउट’ हे चॅटिंग अॅप सुरु  केलं होतं. सुरुवातीला या …

एका वर्षात गुगल बंद करणार ही सेवा!

मुंबई : गुगल हे जगभरातलं लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आता मात्र, गुगलकडून लवकरच एक सेवा बंद केली जाणार आहे. 9to5Google ने दिलेल्या माहितीनुसार, गुगलचं लोकप्रिय चॅटिंग अॅप ‘हँगआउट’ची सेवा 2020 नंतर बंद केली जाणार आहे. अर्थात वर्षभरानंतर गुगलचं ‘हँगआउट’ बंद होईल.

गुगलने 2013 साली आपल्या युजर्ससाठी ‘हँगआउट’ हे चॅटिंग अॅप सुरु  केलं होतं. सुरुवातीला या चॅटिंग अॅपला युजर्सने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कालांतराने या चॅटिंग अॅपच्या युजर्सची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे गुगलने हे चॅटिंग अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने हे चॅटिंग अॅप Gmail वापरकर्ते वापरतात. Gmail वापरकर्त्यांना मेलसोबत हँगआउटच्या माध्यामातून चॅटिंग करता येते. आता गुगलच्या या निर्णयामुळे Gmail वापरकर्त्यांना बंदीनंतर चॅटिंग करता येणार नाही.

हँगआउट ही गुगलची अशी सेवा आहे की, या माध्यामातून हँगआउट युजर्स मेसेज, व्हिडीओ चॅटिंग आणि व्हॉईस कॉलिंग करतात. मात्र, गुगलच्या या निर्णयानंतर गुगलच्या युजर्सने नाराज होऊ नका. कारण गुगल लवकरच हँगआउटपेक्षा चांगली चॅटिंग अॅप सुरू करणार आहे. हँगआउट ऐवजी गुगल G Suite सुरु करणार आहे. यामध्ये हँगआउटपेक्षा चांगल्या सेवा घेता येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *