OnePlus-7 लवकरच भारतात लाँच होणार, किंमत तब्बल....

मुंबई : भारतातील OnePlus मोबाईलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus-7 सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. बंगळुरु येथे 14 मे रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. OnePlus कंपनी यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन स्मार्टफोनचे तीन व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामध्ये OnePlus-7 vanilla edition, OnePlus-7 Pro आणि OnePlus-7 Pro 5-G हे …

OnePlus-7 लवकरच भारतात लाँच होणार, किंमत तब्बल....

मुंबई : भारतातील OnePlus मोबाईलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus-7 सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. बंगळुरु येथे 14 मे रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. OnePlus कंपनी यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन स्मार्टफोनचे तीन व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामध्ये OnePlus-7 vanilla edition, OnePlus-7 Pro आणि OnePlus-7 Pro 5-G हे तीन व्हेरिअंट असतील. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती अनेकवेळा लीक झाली. प्रसिद्ध टिपस्टर इशान अग्रवालने OnePlus-7 स्मार्टफोनच्या व्हेरिअंटबाबत काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. लीक झालेल्या माहितीनुसार, यावेळी OnePlus-7 Pro स्मार्टफोनचा 12 GB रॅम असलेला व्हेरिअंट लाँच करण्यात येणार आहे.

OnePlus-7 Pro ची किंमत किती?

OnePlus च्या या तिन्ही स्मार्टफोनला 6GB रॅम + 128 GB स्टोरेज, 8GB रॅम + 265 GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 265 GB स्टोरेजमध्ये लाँच केलं जाणार आहे. OnePlus-7 Pro च्या 8GB रॅम + 265 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत जवळपास 58 हजार  640 रुपये असेल, तर 12GB रॅम + 265 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 64 हजार 120 रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 48 हजार 999 रुपये असेल.

OnePlus-7 Pro स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनबाबत लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus-7 Pro मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. तर 13 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा असेल. OnePlus कंपनी पहिल्यांदाच आपल्या कुठल्या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरा सेटअप देत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा QHD डिस्प्ले, इन डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेंसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असेल, अशीही माहिती आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *