10 मिनिटं चार्जिंगमध्ये 10 तास नो टेन्शन, वनप्लसचे ब्लूटूथ ईअरफोन लाँच

मुंबई : वनप्लसने बंगळुरुमध्यील एका कार्यक्रमात वनप्लस 7 मोबाईलसह ‘वनप्लस बुलेट वायरलेस 2’ ईअरफोन लाँच केले. कंपनीने या ईअरफोनची किंमत 5 हजार 990 रुपये ठेवली आहे. सध्या कंपनीने हे ईअरफोन कुठे मिळतील याबद्दल माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे या ईअफओनला 10 मिनिटं चार्ज करा आणि 10 तास वापरु शकता, असा दावा कंपनीने केला आहे. गेल्यावर्षी …

10 मिनिटं चार्जिंगमध्ये 10 तास नो टेन्शन, वनप्लसचे ब्लूटूथ ईअरफोन लाँच

मुंबई : वनप्लसने बंगळुरुमध्यील एका कार्यक्रमात वनप्लस 7 मोबाईलसह ‘वनप्लस बुलेट वायरलेस 2’ ईअरफोन लाँच केले. कंपनीने या ईअरफोनची किंमत 5 हजार 990 रुपये ठेवली आहे. सध्या कंपनीने हे ईअरफोन कुठे मिळतील याबद्दल माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे या ईअफओनला 10 मिनिटं चार्ज करा आणि 10 तास वापरु शकता, असा दावा कंपनीने केला आहे.

गेल्यावर्षी लाँच केलेल्या बुलेट वायरलेस आणि यावर्षी लाँच केलेल्या बुलेट वायरलेस 2 च्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. कंपनीने या ईअरफोनच्या हार्डवेअरलाही अपग्रेड केलं आहे. नवीन ईअरफोन बेस आऊटपूट, क्लॅरिटी आणि क्रिस्पसाठी खास आहे. याशिवाय यामधील चार्जिंगही पहिल्या मॉडेलपेक्षा अधिक चांगली आहे. यामध्ये वार्प चार्ज टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला आहे आणि चार्जिंग स्पीडही ओरिजनल वनप्लस बुलेट वायरलेस ईअरफोनपेक्षा नवीन  ईअरफोनमध्ये अधिक दिला आहे, अशी माहिती कंपनीने कार्यक्रमात दिली.

या नवीन ईअरफोनमध्ये विंगटिप्स दिले आहेत आणि आधीच्या मॉडेलसारखे प्ले आणि पॉज कंट्रोलसाठी मॅग्नेटिक स्विच दिला आहे. नवीन ईअरफोनमध्ये आऊटपूटसाठी अपग्रडेड ट्रिपल यूनिट स्ट्रक्चर आणि बेससाठी मोठा मुव्हिंग कॉईल दिला आहे.

वनप्लस बुलेट वायरलेस 2 मध्ये ग्राहक सिंगल क्लिकमध्ये सहजपणे दोन पेअर्ड ऑडिओ डिव्हाईस स्विच करु शकतो. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट दिला आहे. तसेच यामधये hi-res ऑडिओ फाईल्ससाठी aptX HD codec चा सपोर्ट दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *