ओप्पोचा फोल्डेबल फोन लवकरच बाजारात

मुंबई: प्रत्येक कंपनी ग्राहकांसाठी नव नवीन ऑफर देत असते. ओप्पो कंपनीही लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. हा फोन येत्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2019 मध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉँग्रेस 2019 (MWC) मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. चीनच्या स्मार्टफोन कंपनीकडून याआधीही फोल्डेबल डिव्हाईसवर काम करण्यात येत आहे. नुकतेच सॅमसंगनेही फोल्डेबल फोन लाँच करत मोबाईल इंडस्ट्रीमध्ये सर्वांचे लक्ष …

, ओप्पोचा फोल्डेबल फोन लवकरच बाजारात

मुंबई: प्रत्येक कंपनी ग्राहकांसाठी नव नवीन ऑफर देत असते. ओप्पो कंपनीही लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. हा फोन येत्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2019 मध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉँग्रेस 2019 (MWC) मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. चीनच्या स्मार्टफोन कंपनीकडून याआधीही फोल्डेबल डिव्हाईसवर काम करण्यात येत आहे.

नुकतेच सॅमसंगनेही फोल्डेबल फोन लाँच करत मोबाईल इंडस्ट्रीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सॅमसंगने लाँच केलेला फोन हा जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. गुगलसोबतच्या भागिदारीतून बनवलेल्या फोनला कवर डिस्प्लेही दिला आहे.

भारतीय मोबाईल बाजारपेठेत आज अनेक वेगवेगळे फीचर असेलेले फोन उपलब्ध आहेत. सध्या शाओमीने भारतातील मोबाईल इंडस्ट्रीमध्ये पहिल्या स्थानावर आपले वर्चस्व राखले आहे. मात्र ओप्पो फोल्डेबल फोन लाँच करणार असल्याने, नक्कीच शाओमीसमोर नवीन आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

टेक्नोलॉजी ब्लॉगवरील अहवालानुसार, ओप्पोचे प्रोडक्ट मॅनेजर च्यूक वँग चीनमधील हेड ऑफिसमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहेत. या अहवालात सांगितले आहे की, पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या (MWC 2019) कार्यक्रमात या स्मार्टफोनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. तसेच रिलीज तारीख आणि स्पेसिफिकेशन्स संबधित माहिती अजून समोर आलेली नाही.

सोबतच ट्वीकर्सने दावा केला आहे की, च्यूक वँग यांनी 2019 मधील पहिल्या सहा महिन्यात  5जी ओप्पो स्मार्टफोनही लाँच करणार असल्याची माहिती दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *