तुम्ही असा विचित्र कॅमेरा कधीही बघितला नसेल

तुम्ही असा विचित्र कॅमेरा कधीही बघितला नसेल

मुंबई : Oppo ही स्मार्टफोन बनवणारी कंपनी आणखी एक सब ब्रँड लाँच करण्याच्या तयारीत आहे. Reno या नावाने हा सब ब्रँड लाँच होणार आहे. येत्या 10 एप्रिलला हा ब्रँड अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे. या ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण म्हणजे या स्मार्टफोनचा विचित्र कॅमेरा. आतापर्यंत तुम्ही असा कॅमेरा कुठेही बघितलेला नसेल. हा एक पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे.

फ्रंट कॅमेरा ओपन केल्यानंतर या स्मार्टफोनच्या वरच्या बाजूने एक त्रिकोणी स्लाईड वर येते. यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 10X झूम करणारा ऑप्टिकल लेन्स देण्यात आला आहे. तसेच यामध्ये टाईप सी पोर्ट देण्यात आलं आहे. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 3.5 mm चा ऑडिओ जॅकही देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे.

Oppo Reno या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असू शकतो. तसेच यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा दुसरा रिअर कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *