PhonePe ची 'लिक्विड फंड' सेवा, बचतीचा नवा मार्ग

फोनपे 'लिक्विड फंड'चे यूझर्स 500 रुपयांपासून बचत करायला सुरुवात करु शकतात.

PhonePe ची 'लिक्विड फंड' सेवा, बचतीचा नवा मार्ग

मुंबई : ‘फोनपे’ या अग्रगण्य डिजिटल पेमेंट कंपनीने ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. ‘फोनपे’कडून ‘लिक्विड फंड’ हे सेव्हिंग्ज प्रॉडक्ट लाँच करण्यात आलं आहे. ही सेवा 175 मिलिअन फोनपे अॅप यूझर्सना बचत वाढवण्यासाठी फायदेशीर (PhonePe Launches Liquid Fund) ठरणार आहे.

फोनपे ‘लिक्विड फंड’चे यूझर्स 500 रुपयांपासून बचत करायला सुरुवात करु शकतात. फोनपे ‘लिक्विड फंडची’ संपूर्ण प्रक्रिया ही पेपरलेस आहे. फक्त पाच मिनिटांच्या आत ही प्रक्रिया करता येणार आहे.

फोनपे ‘लिक्विड फंड’चा वापर करुन कमी कालावधीत बँक एफडीच्या स्वरुपासारखे हाय रिटर्न्स ग्राहकांना प्राप्त करता येणार आहेत. ग्राहक आपले पैसे कधीही आणि कुठेही झटपट पद्धतीने काढू शकतात. कोणत्याही प्रकाचा ‘लॉक इन पिरिएड’ किंवा ‘मिनिमम बॅलन्स’चं बंधन ग्राहकांना नसेल.

विशेष म्हणझे यूझर्सना आपल्या खात्यातील पैसे फोनपे ‘लिक्विड फंड’वर पाहायला मिळणार आहेत. फोनपे ‘लिक्विड फंड’चा यूझर इंटरफेस सोपा असल्यामुळे त्याचा वापर कोणीही अगदी सहजरित्या (PhonePe Launches Liquid Fund) करु शकेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *