मोदींच्या घोषणेवर सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं ट्विट केलं …

मोदींच्या घोषणेवर सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे मोदी नेमकी कोणती घोषणा करणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर मोदींनी 12 वाजून 24 मिनिटांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती देशासह जगाला दिली. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या घोषणेपूर्वी भाजप नेत्यांचे, मंत्र्यांचे फोन बंद करण्यात आले होते.

मोदींच्या भाषणाच्या आधी आणि नंतर फेसबुक, ट्विटरसह सर्वच सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट सुरु झाला. मिम्स, जोक्स, व्हिडीओ, फोटो इत्यादी गोष्टी सोशल मीडियावर शेअर केले जात होते, त्यामुळे सोशल मीडियावर हास्याचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

 

संबंधित बातम्या –

मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी

आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *