PUBG गेमचा नवा लाईट व्हर्जन लाँच

भारतात मोठ्या प्रमाणात पब्जी (PUBG) गेमचे यूजर्स आहेत. दिवसेंदिवस या गेमची क्रेझ वाढत आहे. पण काहींच्या मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे हा गेम चालत नाही. अशा लोकांसाठी पब्जीने लाईट व्हर्जन आज (26 जुलै) भारतात लाँच केला आहे.

PUBG गेमचा नवा लाईट व्हर्जन लाँच

मुंबई : भारतात मोठ्या प्रमाणात पब्जी (PUBG) गेमचे यूजर्स आहेत. दिवसेंदिवस या गेमची क्रेझ वाढत आहे. पण काहींच्या मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे हा गेम चालत नाही. अशा लोकांसाठी पब्जीने लाईट व्हर्जन आज (26 जुलै) भारतात लाँच केला आहे. त्यामुळे आता कमी रॅम असणाऱ्या मोबाईलमध्येही पब्जी (PUBG) गेम चालू शकतो.

या लाईट व्हर्जनमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये हा गेम चालू शकतो. कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये हेवी गेम खेळता येत नाही, ज्यामुळे फोनही हँग होतात. आता ज्या यूजर्सकडे कमी रॅम म्हणजे 2 जीबी पेक्षा कमी रॅमचे स्मार्टफोन आहेत ते आता हा गेम सहजपणे खेळू शकतात.

हे नवीन व्हर्जन सर्व यूजर्सला एकसारखा अनुभव देईल. लाईट व्हर्जन हा पब्जीच्या मूळ व्हर्जनप्रमाणेच काम करेल. या व्हर्जनमध्ये प्लेअरला स्वत: चालतानाही त्याला हील करु शकतात. तसेच प्लेअर्सला काही निवडक गेम मोडमध्ये नवीन हत्यारही मिळतील. यामुळे प्लेअरला नवीन पद्धतीने अटॅक आणि डिफेन्स करण्यासाठी मदत मिळेल.

पब्जी मोबाईल लाईट एक छोटा अॅप आहे. यामध्ये एकावेळी 60 यूजर्स एकत्र गेम खेळू शकतात. याचा अर्थ जुन्या पब्जी स्टाईलमध्येही असा खेळ खेळला जात होता. पण शेवटच्या 10 मिनिटाच्या खेळात जलद गती पाहायला मिळेल. पब्जी यूजर्स हा लाईट व्हर्जन प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतात. हा लाईट व्हर्जन फोनमध्ये 400MB ची स्पेस घेईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *