‘हे’ अॅप इंस्टॉल करु नका, खातं रिकामं होईल, आरबीआयचा सल्ला

मुंबई : जग हे आधुनिकतेच्या दिशेने वेगाने धावत आहे. आज आपल्याला हवं ते मोबाईलच्या एका क्लीकवर आपल्यापर्यंत पोहोचतं. कुणाला पैसे पाठवायचे असेल किंवा घ्यायचे असतील तर तेही ऑनलाईन बँकिंग या सुविधेमुळे सोपं झालं आहे. ही सर्व कामं सोपी नक्कीच झाली आहेत, मात्र त्याससोबतचा धोकाही वाढला आहे. ऑनलाईन बँकिंगचा वापर वाढला आहे, तसेच त्यातून होणाऱ्या फसवणुकाही […]

‘हे’ अॅप इंस्टॉल करु नका, खातं रिकामं होईल, आरबीआयचा सल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : जग हे आधुनिकतेच्या दिशेने वेगाने धावत आहे. आज आपल्याला हवं ते मोबाईलच्या एका क्लीकवर आपल्यापर्यंत पोहोचतं. कुणाला पैसे पाठवायचे असेल किंवा घ्यायचे असतील तर तेही ऑनलाईन बँकिंग या सुविधेमुळे सोपं झालं आहे. ही सर्व कामं सोपी नक्कीच झाली आहेत, मात्र त्याससोबतचा धोकाही वाढला आहे. ऑनलाईन बँकिंगचा वापर वाढला आहे, तसेच त्यातून होणाऱ्या फसवणुकाही वाढल्या आहेत. एका अशाच फसवणूक करणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनपासून सावध राहण्याचा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिला आहे.

आरबीआयने लोकांना अशा फसवणूक करणाऱ्या अॅपपासून खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. अशा प्रकारचे अॅप इंस्टॉल करण्यासाठी फसवणूक करणारे लोक अनेक प्रयत्न करतात. त्यामुळे कुठलाही अॅप इंस्टॉल करण्याआधी खात्री करुन घ्या. ‘एनीडेस्क’ हे अशाच प्रकारचं एक अॅप्लिकेशन आहे. याच्या मदतीने ऑनलाईन फसवणूक होऊ शकते, असे आरबीआयने सांगितलं. आरबीआयने ग्राहकांना या ‘एनीडेस्क’ अॅपपासून सावध राहण्याचं आव्हान केलं आहे.

हे अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करताच आपल्या बँक खात्यातील माहिती मिळवतं. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. हा अॅप वारंवार प्रायव्हसी परवानगी मागतो. एकदा आपण परवानगी दिली की त्यानंतर हे अॅप आपल्या मोबाईवर नियंत्रण मिळवतो.

पैसे काढण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करणारे बँकेचे कर्मचारी म्हणून फोन करतात. त्यानंतर ग्राहकाला विश्वासात घेण्यासाठी ग्राहकाचं नाव, फोन नंबर, जन्म तारीख इत्यादी माहिती सांगतात. त्यानंतर कार्ड बंद होऊ शकते अशी भिती दाखवून ग्राहकाकडून त्याच्या कार्डसंबंधी गुप्त माहिती मिळवतात. जसे की खाते क्रमांक, कार्ड क्रमांक, पीन नंबर इत्यादी. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यातील पैसे काढून घेतले जातात, तेही त्याच्या नकळत.

अशाप्रकारे ऑनलाईन बँकिंग फसवणूक होऊ नये यासाठी आरबीआयने खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन असेल तर ते लगेच डिलीट करा. अन्यथा तुम्हीही ऑनलाईन बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.