Realme चे दोन नवे स्मार्टफोन लाँच, 35 मिनिटांत फुल्ल चार्ज होणार

रिअलमी (Realme) ने भारतात नवे स्मार्टफोन Realme X2 Pro आणि Realme 5s लाँच केले आहे. Realme X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे

Realme चे दोन नवे स्मार्टफोन लाँच, 35 मिनिटांत फुल्ल चार्ज होणार

मुंबई : रिअलमी (Realme) ने भारतात नवे स्मार्टफोन Realme X2 Pro आणि Realme 5s लाँच केले आहे. Realme X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे (Realme X2 Pro, Realme 5s Launch). या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. ही किंमत 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजच्या व्हेरिअंटसाठी आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे. तर Realme 5s ची किंमत 9,999 रुपये आहे (Realme X2 Pro, Realme 5s Launch).

35 मिनिटांत Realme X2 Pro फुल्ल चार्ज होणार

Realme X2 Pro स्मार्टफोन 50W सुपर VOOC फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन 35 मिनिटांमध्ये फुल्ल चार्ज होईल. कंपनीनुसार, Realme X2 Pro अपल्या 50W सुपर VOOC फ्लॅश चार्जरसोबत भारताचा सर्वात वेगाने चार्ज होणारा फ्लॅगशिप आहे. कंपनीने दावा केला आहे की PUBG खेळतानाही हा स्मार्टफोन 30 मिनिंटात जवळपास 80% चार्ज होईल. कंपनीनुसार, हा 18W फास्ट चार्जिंगच्या तुलनेत 4 पट जास्त वेगवान आहे.

Realme X2 Pro मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर

Realme X2 Pro मध्ये 90 Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये FHD+ रिझॉल्यूशनसोबत 6.5 इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनची स्क्रिन 2.5D गोरिल्ला ग्लास 5 ने तयार करण्यात आली आहे. Realme X2 Pro स्मार्टफोन नेप्च्यून ब्लू (निळा) आणि लूनर व्हाईट (पांढऱ्या)रंगात उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ColorOS 6  बेस्ड असेल. रिअलमीचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर पावर्ड असेल. त्याशिवाय, कंपनीने Realme X2 Pro चं मास्टर एडिशनही लाँच केलं आहे. मास्टर एडिशनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल.

Realme X2 Pro मध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा

Realme X2 Pro च्या रिअरमध्ये 4 कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या बॅकमध्ये मेन कॅमरा 64 मेगापिक्सलचा आहे. त्याशिवाय, फोनच्या बॅकमध्ये 115 डिग्रीचे फील्ड ऑफ व्यूसोबतच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबत, 13 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेंस देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला 20x हाईब्रिड झूम युझर्सला डीटेल्सवर फोकस करण्यात मदत करेल. फोनच्या फ्रंटमध्ये HDR आणि AI ब्यूटीफिकेशनसोबतच 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

0.23 सेकंदात अनलॉक होणार

Realme X2 Pro स्मार्टफोन UFS 3.0 सोबत येणार आहे, जो रीड आणि राईटच्या स्पीडला 80 टक्क्यांनी वाढवतो. कंपनीनुसार, Realme X2 Pro फक्त 0.23 सेकंदात अनलॉक होईल. स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट जनरेशननुसार GOODIX 3.0 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *