'रिअलमी'चा अमेझॉन, फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल

मुंबई : Realme ने तीन दिवसांच्या सेलची घोषणा केली आहे. Realme सेलला Realme Yo! Days असं नाव देण्यात आलं आहे. या सेलचा फायदा तुम्हाला फक्त अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई कॉमर्स वेबसाईटवर घेता येणार आहे. हा सेल 7 ते 9 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सेलच्या दरम्यान Realme U1 4GB Ram/64GB इंटरनल स्टोअरेज आणि …

'रिअलमी'चा अमेझॉन, फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल

मुंबई : Realme ने तीन दिवसांच्या सेलची घोषणा केली आहे. Realme सेलला Realme Yo! Days असं नाव देण्यात आलं आहे. या सेलचा फायदा तुम्हाला फक्त अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई कॉमर्स वेबसाईटवर घेता येणार आहे. हा सेल 7 ते 9 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सेलच्या दरम्यान Realme U1 4GB Ram/64GB इंटरनल स्टोअरेज आणि Realme U1 Fiery Gold रंगाचा व्हेरिऐंट यावर्षी सेलमध्ये उपलब्ध असतील.

रिअलमी सेलमध्ये मोबाईलशिवाय कंपनीच्या इतरही वस्तूंचा समावेश सेलमध्ये असणार आहे. त्यात मोबाईल अॅक्सेसरीजसह इतर गोष्टी सेलमध्ये उपलब्ध असतील. तसेच Realme 2, Realme C1, Realme U1 आणि Realme 2 Pro स्मार्टफोनही उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे Amazon वर शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी Realme U1 वर एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. ही सूट जुना मोबाईल एक्सचेंज केल्यावर मिळेल. तर फ्लिपकार्टवर शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना Realme 2 Pro च्या प्री-पेड ऑर्डसवर एक हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.


6 जानेवारीला कंपनीतर्फे एक स्पर्धा होस्ट केली आहे. त्याला ‘R power’ चॅलेंज असं नाव दिलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राहक Realme U1 आणि Realme Buds वर शंभर टक्के डिस्काऊंट ऑफर जिंकू शकता. याशिवाय कंपनीच्या तीन दिवसांच्या सेलमध्ये दुपारी 12 वाजता रिअलमी बॅकपॅक्स 1 रुपयांत मिळणार आहे. या बॅकपॅक्सची किंमत दोन हजार 399 रुपये आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *