रिअलमी यू1 भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स

  • Sachin Patil
  • Published On - 23:21 PM, 28 Nov 2018

नवी दिल्ली : रिअलमीने नवीन स्मार्टफोन ‘रिअलमी यू1’ भारतात लाँच केला आहे. फोनचे खास वैशिष्ट म्हणजे फोनमध्ये ड्यूड्रॉप डिस्प्ले आणि 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रिअलमी फोनच्या यू सीरीजमधील हा पहिला स्मार्टफोन असून बुधवारी नवी दिल्ली येथे हा फोन लाँच केला.

नुकतेच एका सर्वेमधून भारतातील सर्वात जास्त विकला जाणाऱ्या फोनमध्ये रिअलमी ब्रँडने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर शाओमी आणि दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग आहे.  यामुळे आता यू सीरीजच्या फोनलाही ग्राहक जास्त पसंती देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रिअलमीचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर दिला आहे. रिअलमी यू1ची किंमत 11,999 रुपयापासून सुरु होत आहे. रिअलमी यू1च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरीऐंटची किंमत 14,999 रुपये आहे.

 Realme U1 स्पेसिफिकेशन

  • 6.3 इंचाचा फुल एचडी+आयपीएस एलसीडी डिस्प्ले
  • ड्यूड्रॉप नॉच स्क्रिन
  • मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर
  • 3जीबी आणि 4 जीबी रॅम
  • इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आणि 64 जीबी व्हेरीऐंट
  • रिअर कॅमेरा 13+2 मेगापिक्सल
  • फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सल