रेडमी नोट 6 प्रोची उत्सुकता, फ्लिपकार्टवर फ्लॅश सेल!

मुंबई: शाओमी लवकरच रेडमी नोट 6 प्रो हा फोन भारतात लाँच करत आहे. हा फोन 22 नोव्हेंबरला भारतात लाँच करण्यात येणार असून, फिल्पकार्टवर 23 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध असेल. फ्लिपकार्टनेही या फोनची जाहिरात सुरु केली आहे. शाओमीचे फोन लाँच केल्यानंतर लगेचच ते सोल्ड आऊट म्हणजेच विकले जातात. त्यामुळे बरेच दिवस या फोन्सची वाट पाहावी लागते. आता …

, रेडमी नोट 6 प्रोची उत्सुकता, फ्लिपकार्टवर फ्लॅश सेल!

मुंबई: शाओमी लवकरच रेडमी नोट 6 प्रो हा फोन भारतात लाँच करत आहे. हा फोन 22 नोव्हेंबरला भारतात लाँच करण्यात येणार असून, फिल्पकार्टवर 23 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध असेल. फ्लिपकार्टनेही या फोनची जाहिरात सुरु केली आहे. शाओमीचे फोन लाँच केल्यानंतर लगेचच ते सोल्ड आऊट म्हणजेच विकले जातात. त्यामुळे बरेच दिवस या फोन्सची वाट पाहावी लागते. आता रेडमी नोट 6 प्रो या फोनला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागणार आहे.

सध्या भारतात शाओमी फोनला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. रेडमी 6 प्रो फोनसाठी ग्राहकही उत्साहित असल्याचे दिसत आहे.

फोनची किंमत किती?

रेडमी नोट 6 प्रो हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला, तेव्हा फोनची किंमत जवळपास 15 हजार रुपये होती. मात्र भारतात याची किंमत 14 हजार 999 रुपये असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी शाओमीने रेडमी नोट 5 प्रो हा फोन लाँच केला, तेव्हा 4GB फोनची किंमत 13 हजार 999 रुपये होती, 6 GB वेरियंटची किंमत 16 हजार 999 रुपये इतकी होती. या फोनचा वाढता प्रतिसाद पाहून कंपनीने 4GB फोनच्या किमतीमध्ये एक हजार रुपये वाढवण्यात आले होते.. मात्र आता रेडमी नोट 6 प्रो हा फोन लाँच होत असल्याने, कंपनीने पुन्हा रेडमी नोट 5 प्रो च्या 4GB/6GB किंमती 1-1 हजाराने कमी केल्या.

‘रेडमी नोट 6 प्रो’चे फीचर्स

शाओमीच्या रेडमी नोट 6 प्रोमध्ये 6.26 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रिनवर 2.5D कॉर्निंग गोरिला ग्लासची सुविधा देण्यात आली आहे. 4 जीबी रॅम सोबत फोनमध्ये 64 जीबी स्टोरेज दिले असून, रेडमी नोट 5 प्रो प्रमाणे 6 प्रोमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोन अँड्रॉईड ओरियो आधारित MIUI वर चालणार आहे.

या फोनला रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. तर फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. दोन्ही कॅमेरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस लेन्सही आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *