Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन, 199 रुपयांमध्ये 42GB डेटा

जियोनेही त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. मात्र, तरीही जियोचे प्लॅन्स हे इतर कंपन्यांच्या तुलनेत 25 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे.

Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन, 199 रुपयांमध्ये 42GB डेटा

मुंबई : बीएसएनएलसोडून देशातील इतर सर्व बड्या टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात त्यांच्या प्रिपेड प्लॅन्सची किंमत वाढवली आहे (Reliance Jio Prepaid Plan). शिवाय कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्समध्येही अनेक बदल केले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना एक योग्य प्लॅन निवडण्यात अडचण येऊ शकते. यामध्ये रिलायन्स जियोच्या ग्राहकांचाही समावेश आहे. जियोनेही त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. मात्र, तरीही जियोचे प्लॅन्स हे इतर कंपन्यांच्या तुलनेत 25 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे (Reliance Jio Prepaid Plans).

Reliance Jio चा 199 चा प्लॅन

200 रुपयांपेक्षा कमी किमतीत जर कोणी सर्वात जास्त डेटा देणारा प्लॅन असेल तर तो रिलायन्स जियोचा 199 रुपये वाला प्लॅन आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये जियो ग्राहकांना दरदिवसाला 1.5 जीबी डेटा शिवाय 100 एसएमएस दिवसाला मिळतात (Reliance Jio 199 Plan).

दिवसाला 1.5 जीबी डेटा देणारा कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. 28 दिवस ग्राहकाला या हिशोबाने 42 जीबी डेटा मिळतो. यामध्ये जियो टू जियो कॉलिंग अनलिमिटेड आहे. तर इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 नॉन-जियो मिनटं मिळतात. शिवाय, जियो अॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत मिळतं. नॉन-जियो मिनटं संपल्यानंतर ग्राहकांना 6 पैसे प्रती मिनटाच्या दराने चार्ज केलं जातं.

जियोचा हा प्लॅन खासकरुन त्या ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, जे कॉलिंगपेक्षा जास्त डेटाचा वापर करतात. एअरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्या अशा प्रकारच्या प्लॅनसाठी जवळपास 250 रुपये चार्ज करतात.

Reliance Jio best and cheapest prepaid plan

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *