स्वस्त आणि मस्त 'Kwid' कारची किंमत वाढली!

मुंबई : फ्रान्समधील प्रसिद्ध कंपनी रेनॉने क्विड (Kwid) या स्वस्त आणि मस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेल्या कारची किंमत वाढवली आहे. क्विडच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा रेनॉ कंपनीने केली आहे. येत्या एक एप्रिलपासून क्विडची वाढीव किंमत लागू होईल, अशीही माहिती कंपनीने दिली आहे. सध्या दिल्लीतील एक्स-शोरुममध्ये क्विड कारची किंमत 2.66 लाखांपासून 4.63 लाखांच्या …

kwid, स्वस्त आणि मस्त ‘Kwid’ कारची किंमत वाढली!

मुंबई : फ्रान्समधील प्रसिद्ध कंपनी रेनॉने क्विड (Kwid) या स्वस्त आणि मस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेल्या कारची किंमत वाढवली आहे. क्विडच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा रेनॉ कंपनीने केली आहे. येत्या एक एप्रिलपासून क्विडची वाढीव किंमत लागू होईल, अशीही माहिती कंपनीने दिली आहे. सध्या दिल्लीतील एक्स-शोरुममध्ये क्विड कारची किंमत 2.66 लाखांपासून 4.63 लाखांच्या दरम्यान आहे.

क्विडच्या हॅचबॅकला 0.8 लीटर आणि एक लीटर पॉवरट्रेनचे मॅन्युअल आणि ऑटोमेटेड ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. शिवाय, रेनॉ कंपनीने क्विडच्या वेगवेगळ्या अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सुरक्षा फीचर्समध्येही अपडेट केले असल्याने कारची किंमत तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ABS आणि EBD), तसेच ड्रायव्हर एअर बॅगचाही समावेश नव्या अपडेटमध्ये करण्यात आला आहे.

गेल्याच आठवड्यात टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किंमती 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. टाटाच्याच जॅगवॉर लँडरोव्हरचे दरही वाढवण्यात आले आहेत. आगामी काळात इतर कार कंपन्याही आपापल्या कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे एकंदरीत आगामी आर्थिक वर्षात कारच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *