12 GB रॅम, एक्सिनोस 9 ऑक्टा प्रोसेसर, येतोय सॅमसंगचा Galaxy S10

मुंबई : सॅमसंगने जगातील पहिला चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन नुकताच लाँच केला होता. आता लवकरच सॅमसंग जगातील पहिला 12 GB रॅमचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, सॅमसंग कंपनी Galaxy S10 मध्ये 12 GB रॅम आणण्याच्या प्रयत्नात पाह आहे. या स्मार्टफोनची किंमत 61,900 रुपये इतकी सांगण्यात येत आहे. हाँगकाँग बेस्ड जीएफ सिक्योरिटीने दिलेल्या वृत्तानुसार, …

samsung, 12 GB रॅम, एक्सिनोस 9 ऑक्टा प्रोसेसर, येतोय सॅमसंगचा Galaxy S10

मुंबई : सॅमसंगने जगातील पहिला चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन नुकताच लाँच केला होता. आता लवकरच सॅमसंग जगातील पहिला 12 GB रॅमचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, सॅमसंग कंपनी Galaxy S10 मध्ये 12 GB रॅम आणण्याच्या प्रयत्नात पाह आहे. या स्मार्टफोनची किंमत 61,900 रुपये इतकी सांगण्यात येत आहे.
हाँगकाँग बेस्ड जीएफ सिक्योरिटीने दिलेल्या वृत्तानुसार, Galaxy S10 मध्ये 1TB मेमोरीसोबत 12 GB रॅम दिली जाणार आहे. या आधी सॅमसंग कंपनीने 8 GB रॅमचा स्मार्टफोन लाँच केला होता.

वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंगच्या Galaxy S10 या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट करेल. मात्र, सॅमसंगने प्रसिध्द केलेल्या पत्रकात 5G सेवेचा काही उल्लेख करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनमध्ये Exynos 9 Octa हे प्रोसेसर असणार आहे. तसेच सॅमसंगच्या येणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हेच प्रोसेसर वापरलं जाणार आहे.

Galaxy S10 plus हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 2019ची वाट पाहावी लागणार आहे. हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारी 2019 ला लाँच होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी Galaxy S10ची वैशिष्ट्ये :

• 6 इंच (15.24 cm) आकाराचा सुपर एमोलेड डिस्प्ले
• 12 GB RAM
• सॅमसंग Exynos 9 Octa
• 2.7GHz ऑक्टा- कोअर प्रोसेसर
• 64 GB आणि 400 जीबी एक्स्पांडेबल स्टोरेज
• फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल
• रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सल ड्यूयल कॅमेरा
• बॅटरी क्षमता 3500mAh

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *