सॅमसंगचा 'ड्युअल डिस्प्ले' मोबाईल लाँच

मुंबई– सध्या टेक्नोलॉजीमध्ये दिवसेंदिवस नव-नवीन गोष्टी घडत आहेत. नुकतेच चीनने निर्माण केलेला बातमी देणारा रोबोट असो, अथवा दुबई पोलिसांनी लाँच केलेली हवेत उडणारी बाईक असो, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता मोबाईल इंडस्ट्रीमध्येही सॅमसंगने लाँच केलेल्या आगळ्या-वेगळ्या स्मार्टफोनची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सॅमसंगने पहिल्यांदाच ड्युअल डिस्प्लेचा मोबाईल लाँच केला आहे. सॅमसंगने नवीन क्लॅमशेल स्मार्टफोन …

सॅमसंगचा 'ड्युअल डिस्प्ले' मोबाईल लाँच

मुंबई– सध्या टेक्नोलॉजीमध्ये दिवसेंदिवस नव-नवीन गोष्टी घडत आहेत. नुकतेच चीनने निर्माण केलेला बातमी देणारा रोबोट असो, अथवा दुबई पोलिसांनी लाँच केलेली हवेत उडणारी बाईक असो, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता मोबाईल इंडस्ट्रीमध्येही सॅमसंगने लाँच केलेल्या आगळ्या-वेगळ्या स्मार्टफोनची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सॅमसंगने पहिल्यांदाच ड्युअल डिस्प्लेचा मोबाईल लाँच केला आहे.

सॅमसंगने नवीन क्लॅमशेल स्मार्टफोन W2019 लाँच केला आहे. या नव्या फोनला रिअर आणि फ्रंट असा ड्युअल डिस्प्ले आणि की-बोर्डही देण्यात आला आहे. “स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल लवकरच घोषणा करण्यात येईल. पण एक नक्की आहे की हा फोन चीन यूनिकॉम एक्स्क्लुझिव्ह असेल” अस सॅमसंगकडून सांगण्यात आलं आहे. W2019 फोनची किंमत एक लाख चार हजार 182 रुपये असेल, असं बोललं जात आहे.

W2019 चे फीचर्स

W2019 फोनमध्ये 4.2 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्यात दोन्हींमध्ये स्क्रीन आहे. सॅमसंगने सांगितले आहे की, हा फोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरवर काम करतो. फोनची बॅटरी क्षमता 3070mAh असून फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी/256 जीबी स्टोरेज सोबत असणार आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवूही शकता.

या फोनला प्लॅस्टिक बॉडी आणि मेटॅलिक फिनिशिंग दिलेली आहे. फोन ड्युअल रियर कॅमेरा 12+12 मेगापिक्सल एवढा आहे. आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल एवढा देण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *