‘सॅमसंग’चा सेल : ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट  

मुंबई : सॅमसंगने आपल्या युजर्ससाठी ‘बेस्टडेज सेल’ची सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये 9 हजार रुपयांच्या एक्सेंज ऑफरसोबत डिस्काऊंटही दिला जाणार आहे. हा सेल  31 डिसेंबर 2018 पर्यंत सुरु आहे. या सेलच्या डिस्काऊंट ऑफरमध्ये Samsung Galaxy Note 9, Galaxy S9+ आणिGalaxy A9 (2018) या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. या सेल अंतर्गत सॅमसंगचे प्रत्येक ई-स्टोर, सॅमसंग स्मार्ट कॅफे आणि इतर ऑनलाईन साईटवर …

‘सॅमसंग’चा सेल : ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट  

मुंबई : सॅमसंगने आपल्या युजर्ससाठी ‘बेस्टडेज सेल’ची सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये 9 हजार रुपयांच्या एक्सेंज ऑफरसोबत डिस्काऊंटही दिला जाणार आहे. हा सेल  31 डिसेंबर 2018 पर्यंत सुरु आहे. या सेलच्या डिस्काऊंट ऑफरमध्ये Samsung Galaxy Note 9, Galaxy S9+ आणिGalaxy A9 (2018) या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. या सेल अंतर्गत सॅमसंगचे प्रत्येक ई-स्टोर, सॅमसंग स्मार्ट कॅफे आणि इतर ऑनलाईन साईटवर या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

या सेलमध्ये Galaxy A7 (2018) या स्मार्टफोनसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना EMI वर देखील खरेदी करता येईल. तसेच एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवर कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

बेस्टडेज सेलमध्ये सॅमसंगचा Galaxy A7 (2018) हा स्मार्टफोन 21 हजार 990 रुपयांत मिळणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच झाला होता. या 4G रॅम असलेल्या स्मार्टफोनची मुळ किंमत 23 हजार 990 रुपये तर 6G रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 28 हजार 990 इतकी आहे.

Galaxy J8 हा स्मार्टफोन केवळ 15 हजार 990 रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, या सेलमध्ये जगातला पहिला चार रिअल कॅमेरा असलेला Galaxy A9(2018) हा स्मार्टफोन 4 हजार रुपयांच्या डिस्काऊंटने खरेदी करता येईल. तर Galaxy Note 9 आणि Galaxy S9 plus हे दोन्ही स्मार्टफोन 9 हजार रुपयांच्या डिस्काऊंटने उपलब्ध आहेत.

तर सॅमसंगच्या आणखी स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती सॅमसंगच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *