शाओमीच्या LED TV किंमतीत घट, पाहा किंमत...

मुंबई : चीनची प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने भारतात एलईडी टीव्हींच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी गिफ्ट दिले आहे. शाओमीने 32 इंचाचा Mi LED smart TV 4A, Mi LED TV 4C PRO आणि 49 इंचाचा Mi LED 4A PRO च्या किंमतीत घट केली आहे. आता या निर्णयानंतर Mi LED …

शाओमीच्या LED TV किंमतीत घट, पाहा किंमत...

मुंबई : चीनची प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने भारतात एलईडी टीव्हींच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी गिफ्ट दिले आहे. शाओमीने 32 इंचाचा Mi LED smart TV 4A, Mi LED TV 4C PRO आणि 49 इंचाचा Mi LED 4A PRO च्या किंमतीत घट केली आहे. आता या निर्णयानंतर Mi LED Smart TV 4A टीवी 1,500 रुपयाने स्वस्त, Mi LED TV 4C PRO दोन हजार रुपयांनी तर 49 इंचाचा Mi LED 4A PRO मध्ये एक जार रुपयांची घट केली आहे.

या निर्णयाआधी 32 इंचाच्या स्मार्ट टीव्ही 4A ची किंमत 15 हजार 999 रुपये होती. आता हा एलईडी टीव्ही तुम्ही 14 हजार 499 रुपयांत खरेदी करु शकता. सर्वात विशेष म्हणजे mi.com वर पहिले हा टीव्ही 13 हजार 999 रुपयांत उपलब्ध होता. मात्र आता किंमतीत घट झाल्यावर 12 हजार 499 रुपयांत मिळत आहे.

अशा प्रकारे 32 इंचाचा Mi LED TV 4C PRO ची किंमत 16 हजार 999 रुपये होती. मात्र आता तुम्ही 14 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता. शाओमीचा 49 इंचाचा Mi LED TV 4C PRO आता 30 हजार 999 रुपयांत मिळणार आहे.

लवकरच इतर टीव्ही कंपन्याही सूट देतील अशी शक्ययता वर्तवली जात आहे. या सूटमुळे नववर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना आपल्या आवडीचा टीव्ही अल्प दरात मिळत आहे. यासाठी तुम्ही एमआय शॉप, एमआय वेबाईट (www.mi.com/in) किंवा इतर कोणत्याही शॉपला जाऊन ही सूट मिळवू शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *