चिनी मोबाईल नको? 'हे' आहेत 15 हजारापेक्षा कमी किमतीतील सर्वोत्तम पर्याय

चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात 59 चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली (Non Chinese companies Smartphone) आहे.

चिनी मोबाईल नको? 'हे' आहेत 15 हजारापेक्षा कमी किमतीतील सर्वोत्तम पर्याय

मुंबई : चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात 59 चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली (Non Chinese companies Smartphone) आहे. याशिवाय चिनी वस्तू आणि स्मार्टफोनवरही लोंक बहिष्कार घालत आहेत. अशा परिस्थितीत जे भारतीय युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक आहेत ते चिनी कंपन्यांचे फोन खरेदी करण्यास नकार देत आहेत. आज आम्ही तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांमध्ये येणाऱ्या अशाच स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहे. जे चिनी कंपनीचे (Non Chinese companies Smartphone) नाहीत. स्मार्टफोनच्या किमती या त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरुन घेतलेल्या आहेत.

सॅमसंग M30s

सॅमसंग दक्षिण कोरियाची कंपनी आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे 6000mAh ची बॅटरी, 6.4 इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M21

सॅमसंग गॅलेक्सी M21 ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 4 जीबी आणि 64 जीबी स्टोअरेज दिला आहे. त्यात 48MP + 8MP + 5MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 6000mAh ची बॅटरी दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M11

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेजच्या सॅमसंग गॅलेक्सी M11 ची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 13MP + 5MP + 2MP चा रिअर कॅमेरा आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 6.40-इंच डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

नोकिया 7.1

नोकिया फिनलँडची कंपनी आहे. नोकियाच्या या फोनची किंमत 13 हजार 695 आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आहे. त्यासोबत 5.84 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 3060mAh ची बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी 12MP + 5MP चा रिअर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

नोकिया 6.2

नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर या फोनची किंमत 13 हजार 695 आहे. फोनमध्ये ट्रिपल (16MP + 8MP + 5MP) रिअर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय 6.30 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 3500mAh ची बॅटरी दिली आहे.

लावा Z25

लावा ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी आहे. कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 990 रुपये आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 3020mAh ची बॅटरी, MediaTek MT6750 प्रोसेसर दिले जाते.

LG W30 Pro

सॅमसंगप्रमाणे LG ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. यामध्ये 13MP + 5MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय 6.22 इंचाचा डिस्प्ले, 4050mAh ची बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसरमध्ये मिळते.

संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट: डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं?

Special Report | चीनी वस्तूंवर बहिष्कार, आर्थिक नाड्या आवळणार!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *