गाडीचा विमा काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पश्चात्ताप होईल

जर तुम्हीही वाहन विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होऊ शकेल. | Important things about vehicle insurance policy

गाडीचा विमा काढताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पश्चात्ताप होईल
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 6:33 PM

नवी दिल्ली: वाहनांची संख्या जशी वाढत आहे तशी वाहनांचा सुरक्षा विमा काढण्याचेही प्रमाण वाढत आहे. यात सरकारी नियमांचाही प्रभाव आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) आकडेवारीनुसार मागील दोन वर्षात 53.7 कोटी रुपयांचे खोटे वाहन सुरक्षा विमा विकले गेले आहेत. या प्रकरणांची संख्या 498 वरुन 1,192 पर्यंत पोहचली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आयआरडीएच्या दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016-17 मध्ये 498 खोटे विमा विकले गेले. 2017-18 मध्ये या फसवणुकीची संख्या वाढून 823 झाली. तसेच 2018-19 मध्येही ही संख्या वाढून 1192 चा टप्पा पार करुन पुढे गेली.

खोट्या विमांचे तोटे

खोटे विमा विकण्याचे सर्वात जास्त बळी ट्रक चालक आणि दुचाकी वाहक आहेत. हे विमा अशा लोकांनी खरेदी केले ज्यांना प्रवासादरम्यान पोलिसांच्या तपासणीपासून वाचायचे होते. एका वैध विम्याची किंमत 10 हजार रुपयापर्यंत असते. तर खोटा विमा केवळ 5 ते 6 हजार रुपयांमध्ये मिळतो. खोटा विमा घेणाऱ्या बहुतांशी ग्राहकांना संबंधित विमा केवळ पोलीस तपासणीत उपयोगी पडणार असल्याचे माहिती असल्याचेही समोर आले आहे.

पोलीस तपासणीत दंड होऊ नये म्हणून हा विमा

देशातील जवळजवळ 70 टक्के वाहनं विनाविमा सुरु आहेत. आयआरडीएने म्हटले आहे, “आम्हाला 2016 मध्ये AKCPL विमा कंपनी, 2019 मध्ये गोन विमा कंपनी आणि मॅरींस टेक्नोलॉजी या कंपन्यांकडून खोट्या विमा विकल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक विमा जुन्या गाड्यांसाठी खरेदी करण्यात आले होते. त्याचा उद्देश दंडापासून वाचणे हा होता.”

खरा विमा आणि खोटा विमा कसा ओळखाल?

जर तुम्हीही वाहन विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होऊ शकेल.

  • विमा केवळ ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी करा. जर ऑनलाईन विमा खरेदी करत असाल तर संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करा.
  • विमा खरेदी करताना केवळ चेक किंवा ऑनलाईन व्यवहाराचाच उपयोग करा. तसेच चेक देताना केवळ कंपनीच्या नावाने द्या. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देऊ नका.
  • जर तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून विमा घेतला असेल तर तुम्हाला याबाबत ईमेलवर माहिती मिळेल. माहिती न मिळाल्यास तुम्ही विमा कंपनीच्या कॉल सेंटरला कॉल करुन याची खातरजमा करु शकता.
  • कोणत्याही नव्या अथवा अनोळखी कंपनीकडून विमा घेऊन नका. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या विम्यावर संशय असेल तर आयआरडीएच्या वेबसाईटवर विम्यासाठी परवानाधारक कंपन्यांच्या यादीत संबंधित कंपनीचे नाव तपासाल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विम्याचे इतर तपशील देखील मिळू शकतात.
  • IRDAI ने विमा कंपन्यांसाठी वाहन विम्यावर एक QR कोड प्रिंट करणे बंधनकारक केले होते. याद्वारे ग्राहकाला आपल्या विमाचे पूर्ण तपशील मिळतात. ग्राहक आपल्या मोबाईलवरही क्यूआर कोड स्कॅन करुन विम्याची माहिती तपासू शकतो. भारतात डिसेंबर 2015 नंतर विकल्या जाणाऱ्या विम्यावर क्यूआर कोड दिला जातो.
Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.